ETV Bharat / state

मंगळवेढा तालुक्यातील दोघा तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या - मंगळवेढ्यात दोघा तरुणांची आत्महत्या

मंगळवेढा तालुक्यातील २ तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दोघाही तरुणांच्या आत्महत्येचा प्रकार एकाच दिवशी घडला आहे.

दोघा तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
दोघा तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Nov 21, 2020, 9:34 PM IST

पंढरपूर - मंगळवेढा तालुक्यातील बोराळे आणि ब्रह्मपुरी या गावांमध्ये दोघा तरुणांनी गुरुवारी 19 गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. विशाल गजेंद्र चौगुले (वय.२४,रा.बोराळे) आणि कुलदीप ऊर्फ मुन्ना धनंजय पाटील (वय.३०, रा.ब्रह्मपुरी) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबत मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आला आहे.

विशाल चौगुले याने गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातील खोलीत छताच्या हुकला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भीमराव चौगुले यांनी येथील पोलिसांत तक्रार दिली आहे. तर कुलदीप पाटील याने देखील गुरुवारीच दुपारी दोनच्या सुमारास घरातील लोखंडी चॅनलला गळफास घेतला. या प्रकरणी संजय रावसाहेब पाटील यांनी पोलिसांत तक्रार दिली.

दोघांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले असून पोलिसांनी कलम १७४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक फौजदार संजय राऊत व नाईक हरिदास सलगर आदिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.