सोलापूर - रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पंढरपुरात घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. दोघांचेही मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे रूळावर पडलेले होते. मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटलेली नाही. ते दोघेही भाविक असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! राजधानी आठवड्यातून आता चार वेळा धावणार
पंढरपुरात नवीन बस स्थानकाच्या बाजूला असलेल्या रेल्वेच्या रुळावर दोघांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडल्याचे समोर आले. मंगळवारी सकाळी काही लोक रेल्वे रूळाच्या बाजूने जात असताना त्यांना हे दोन मृतदेह समोर दिसले. मतृदेह दिसल्यामुळे रात्री उशिराच्या सुमारास हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
हेही वाचा - पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला 'गुडबाय'
सोमवारी एकादशी होती. एकादशीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपुरात येतात. मृत्यूमूखी पडलेले हे भाविकांपैकीच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.