ETV Bharat / state

चारचाकीची ट्रॅक्टरला धडक, दोघे जळून ठार

चारचाकी गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक बसून चारचाकीला लागलेल्या आगीत दोघांचा जळून मृत्यू झाला आहे.

अपघातात जळालेली गाडी
अपघातात जळालेली गाडी
author img

By

Published : Dec 30, 2019, 11:11 AM IST

Updated : Dec 30, 2019, 12:39 PM IST

सोलापूर - चारचाकी गाडी उसाच्या ट्रॅक्टरला मागून धडकली. यामध्ये चारचाकीने पेट घेतल्याने वाहनातील दोघांचा जळून मृत्यू झाला. हा अपघात कुर्डूवाडी-बार्शी मार्गावरील चिंचगाव (ता.माढा) येथील हॉटेल वैशालीजवळ रविवारी (दि. 29 डिसें) रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला.

चारचाकीची ट्रॅक्टरला धडक

काकासाहेब सुरेश राऊत (वय 28 वर्षे), अविनाश मल्लाप्पा गिराम (वय 33 वर्षे, दोघे रा. रायगव्हाण, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी अपघातात होरपळून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. काकासाहेब राऊत हे छावा संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आहेत.

रायगव्हाण गावातील चौघे पुण्याला स्थळ पाहण्यासाठी गेले होते. मुलगी पाहून परतताना दोघे नातेवाईकांजळ थांबले. तर दोघे आपल्या गावी परतत होते. दरम्यान, हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच कुर्डूवाडी पोलीस नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बंबासह दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, त्यामध्ये जळून दोघांचा मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली असून त्यांचा आक्रोश सुरू आहे.

हेही वाचा - प्रहारच्या कार्यकर्त्यांची 'सायकलवारी'; बच्चू कडू यांना मंत्रिपद मिळावे म्हणून विठ्ठलाला साकडे

Intro:Body:असा अपघात आपण पाहिलात का -
डस्टर चारचाकी उसाच्या ट्रॅक्टर ला मागुन धडकली,डस्टर ने पेट घेतला आणी गाडीतील दोघे जळुन खाक झाले.माढ्याच्या चिंचगाव नजीकची घटना

फोटो-विडीयो

प्रतिनिधी |माढा
कुर्डूवाडी बार्शी मार्गावर माढा
तालुक्यातील चिंचगाव व हाॅटेल वैशाली नजीक रविवारी रात्री पावणे अकरा च्या सुमारास एक भिषण अपघात घडला.
डस्टर चारचाकी ची उसाच्या ट्रॅक्टर ला मागुन जोराची धडक बसली.क्षणाधार्थच होत्याचं नव्हत झालं. डस्टर ने पेट घेतला गाडीतील जळुन खाक झाले.हद्यय पिळवटुन टाकणार्या या अपघाताने सर्वांची मन सुन्नच झाली.

काकासाहेब सुरेश राऊत(वय २८)
अविनाश मल्लाप्पा गिराम(वय ३३) हे
दोघे ही रा. रायगव्हाण
(ता.कळंब जि.उस्मानाबाद )
अशी अपघातात जागीच ठार झालेल्या दोघांची नावे आहेत.

दोघे ही रायगव्हाण चे रहिवासी असुन काकासाहेब राऊत हे छावा संघटनेचे उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आहेत.

एकुण चौघे जण पुण्याला मुलाला स्थळ पाहण्यासाठी पाहण्यासाठी रायगव्हाण
गावातुन गेले होते.दरम्यान मुलगी पाहिल्यानंतर दोघे नातेवाईकाजवळ थांबले.आणि दोघे आपल्या गावाकडे रविवारी रात्री पुण्या हुन निघाले होते.
दरम्यान त्यांच्यावर रविवारी रात्री काळाने घात घातला.
कुर्डूवाडी पोलिसांनी
पेटलेली गाडी विझवण्यासाठी कुर्डूवाडी नगरपालिकेचे अग्निशमन दल ही तैनात केले. गाडी विझवली.
घटनास्थळी कुर्डूवाडी रुग्णवाहिका पोहचताच संतोष चव्हाण
चव्हाण व बालाजी कोळेकर या १०८ रुग्णवाहिकेच्या दोघा कर्मचार्यानी गाडीतुन मृत व्यक्तिना बाहेर काढून कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात आणले.काही
उपस्थिंतानी मदतीचा हात देऊन माणुसकी घडवली. तर काही जणांनी मोबाईल च्या कॅमेर्यात फोटो आणी विडोयो काढण्यात धन्यता मान्यली.
घटना समजताच मृत व्यक्तीच्या नातेवाईंकानी कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली असुन त्यांचा आक्रोश सुरु आहे.शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.Conclusion:
Last Updated : Dec 30, 2019, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.