ETV Bharat / state

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात 1 हजार 400 कोरोनाबाधितांवर उपचार, डॉ. गिराम यांची माहिती - District Hospital Treatment Information Arvind Giram

पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील, तसेच परिसरातील 1 हजार 400 हून अधिक गरीब व गरजू रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.

Pandharpur Sub-District Hospital Dr. Arvind Giram
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय उपचार माहिती
author img

By

Published : Jun 9, 2021, 9:41 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील, तसेच परिसरातील 1 हजार 400 हून अधिक गरीब व गरजू रुग्णांवर आतापर्यंत उपचार करण्यात आले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम यांनी दिली.

हेही वाचा - पंढरपूर तालुक्यात अवैध देशी दारूच्या 3,330 बाटल्या जप्त; दोघांना अटक

कोरोनाबाधितांसाठी ‘नॉन रिब्रीदींग मास्क’चा प्रयोग

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची वाढ झाली होती. कोरोनाबाधितांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी उपजिल्हा रुग्णालयात 50 बेडचे कोविड हॉस्पिटलची क्षमता असतानाही 100 ते 150 कोरोनाबाधितांना उपचारासाठी दाखल करून घेतले होते. अपुरे मनुष्यबळ असताना देखील कोरोनाबाधितांवर योग्य उपचार करण्यात आले. तसेच, ऑक्सिजनची बचत करण्यासाठी ‘नॉन रिब्रीदींग मास्क’चा प्रयोग प्रथमच करण्यात आला, त्यामुळे रुग्णांना आवश्यक ऑक्सिजन मिळण्याबरोबर ऑक्सिजनची बचतही मोठ्या प्रमाणात झाली असल्याची माहिती डॉ. गिराम यांनी दिली.

कोविड रुग्णांच्या उपचाराबरोबरच इतर आजाराच्या रुग्णांवर उपचार

उपजिल्हा रुग्णालयांत कोविड रुग्णांच्या उपचाराबरोबरच इतर आजाराच्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. तसेच, आतापर्यत 7 हजार 990 जणांची कोविड आरटीपीसीआर चाचणी व 16 हजारहून अधिक संशियत व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी डॉ. सचिन वाळुजकर, डॉ. शिवकमल, तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आहोरात्र उपचार केल्याचेही डॉ. गिराम यांनी सांगितले. जिल्हा शल्यचिकित्सिक डॉ. प्रदीप ढेले, प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याचेही डॉ. गिराम यांनी सांगितले.

हेही वाचा - माळशिरसमधील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.