ETV Bharat / state

Solapur Crime: धक्कादायक! एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या

मंगळवेढा येथे आज मंगळवार (दि. 21 फेब्रुवारी)रोजी संध्याकाळी एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर संशयित पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहितीही समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नंदेश्वर गावातील लवाटे वस्ती येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आढळून आले आहे.

Solapur Crime
Solapur Crime
author img

By

Published : Feb 21, 2023, 8:59 PM IST

Updated : Feb 21, 2023, 9:36 PM IST

सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा शहरात आज मंगळवार (दि. 21 फेब्रुवारी)रोजी संध्याकाळी एकाच कुटुंबातील तीन महिलांची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर मानसिकदृष्ट्या अस्थिर संशयित पुरुषाला ताब्यात घेतले असल्याची माहितीही समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नंदेश्वर गावातील लवाटे वस्ती येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृणपणे हत्या : तालुक्यातील नंदेश्वर गावात मंगळवारी दुपारी एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. डोक्यात दगड घालून तीन महिलांची हत्या झाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपासासाठी काही जणांना ताब्यात घेऊन माहिती घेतली जात आहे. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच कुटुंबातील तीन महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.

संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस सुरू : घराशेजारील काही जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या तिन्ही महिलांच्या डोक्यात दगड घालून त्यांना संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. याबाबत संशयित व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. माळी कुटुंबीयांच्या शेजारी राहणाऱ्या शेजारीना चौकशी सुरू आहे. वादांमधूनच ही घटना घडल्याचे आता बोलले जात आहे. हत्येचे कारण अद्याप जरी अस्पष्ट असले तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन अधिकचा तपास करीत आहेत.

मंगळवेढा पोलिसांचा कसून तपास सुरू : मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्याशी संपर्क केला असता, आमचा कसून तपास सुरू आहे.खून करणाऱ्या संशयित व्यक्तीला लवकरच ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करू असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : शिवीगाळ केल्याच्या रागातून ३५ वर्षीय तरुणाचा खून; दोन्ही आरोपी १२ तासातच गजाआड

Last Updated : Feb 21, 2023, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.