ETV Bharat / state

काळवीटाचे मटण विकत घेणे पडले महागात; कोठडीत रवानगी - सोलापूर वन विभाग बातमी

काळवीटचे मटण विकत घेणे महागात पडले असून मटण खाणाऱ्यांना वन विभागाने अटक केली होती. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली.

accused and forest departments officer
आरोपी व वनविभागाचे कर्मचारी
author img

By

Published : Sep 3, 2020, 6:52 PM IST

सोलापूर - काळविटाचे मटण विकत घेणे महागात पडले असून मटण खाणाऱ्यांना वन विभागाने अटक करून पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. काळवीट शिकार प्रकरणी वन खात्याने एकूण तीन आरोपींना अटक केली आहे. विजयकुमार सुदाम भोसले, विष्णू बनसोडे व मुतप्पा कोळी, अशी वन खात्याने अटक केलेल्यांची नावे आहेत.

28 ऑगस्टला दक्षिण सोलापूर तालुक्यातील संगदरी येथे काळवीट हरणाची शिकार करून त्याची 250 ते 300 रुपये प्रति किलो दराने मटण विक्री केले जात होते. नेचर कंजर्वेशनच्या सदस्यांना यापूर्वी देखील खबर लागली होती. त्यांनी एका खबऱ्याला संगदरी गावात गुप्त बातमीसाठी ठेवले होते. तसेच वनविभागाला देखील कल्पना दिली होती. 28 ऑगस्टला रात्री तालुका पोलीस ठाणे व वन विभाग यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विजयकुमार भोसले याला काळवीट हरणाचे मटण विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. त्याच्या घरातून हरणाला पकडण्याचे जाळे, कुऱ्हाड, लोखंडी सुरा, मटण असा विविध मुद्देमाल जप्त केला होता. विजयकुमार भोसले यास न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी विजयकुमार भोसले याची कसून चौकशी करत मटण विकत घेणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. मूतप्पा कोळी व विष्णू बनसोडे यांना वन खात्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 या कायद्याखाली अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांची पोलीस कोठडी आज संपणार असून उद्या (4 सप्टें) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास करून आणखीन आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती वन अधिकारी इर्शाद शेख यांनी दिली.

हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यातील तीन ऑक्सिजन उत्पादक कंपन्या शासनाच्या ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.