ETV Bharat / state

वाळू माफियांना दणका;अवैध वाळू उपशावर कारवाई करत पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

author img

By

Published : Feb 27, 2021, 5:16 PM IST

अवैध वाळू उपशावर कारवाई करत पस्तीस लाखांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Thirty five lakh items seized at illegal sand extraction point in Solapur district
वाळू माफियांना दणका;अवैध वाळू उपशावर कारवाई करत पस्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - अवैध धंदयाचा आढावा घेवून वाळू माफियांवर कडक कारवाई एलसीबीच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक यासाठी कार्यरत करण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सीना नदी पत्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा पॉईंटवर कारवाई केली आहे. या कारवाईत सतरा संशयीत आरोपींविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यातील सर्वात मोठी कारवाई -

एलसीबीच्या पथकाने मागील काही दिवसापूर्वी मौजे कुमठे (ता. अक्कलकोट) येथील वाळू उपस्यावर कारवाई केली होती. अवैध वाळू उपषावर कारवाई करत एकूण 3 लाख 37 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून सहा आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई केली होती. या कारवाईत बोटी (जलयान) जाळण्यात आल्या होत्या.

यारी मशीनच्या साहाय्याने वाळू उपसा केला जात होता-

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की, मौजे आष्टे (ता. मोहोळ जि. सोलापूर ) येथील सीना नदीच्या पात्रातून काही व्यक्ती यारी मशिनच्या सहाय्याने शासनाची परवानगी व रॉयल्टी नसताना चोरून वाळू काढून त्याचा साठा करून विक्री करत आहेत. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलीस प्रमुख यांनी विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी पथकासह मौजे आष्टे (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथे जावून बातमीप्रमाणे खात्री केली. या ठिकाणी ट्रॅक्टरला लोखंडी यारी मशिन जोडून सिना नदीच्या पात्रातून वाळू उपसा करत असल्याचे दिसून आले. त्यावरून वाळू उपसा पॉईंटची खात्री झाल्यानंतर पॉईंट पासून काही अंतरावर असलेल्या उसामध्ये मध्यरात्री पोहचून पिकात पथक दबा धरून बसले असता पहाटेच्या सुमारास काही वाहने वाळू भरण्यासाठी पॉईंटवर आली व वाळू भरून निघण्याच्या तयारीत असताना 12 इसमांना गराडा घालून पकडले. यावेळी 7 संशयीत आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.

35 लाखांचा मुद्देमाल जप्त करून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल-

अवैध वाळू पॉईंटच्या ठिकाणाहून 1 ट्रॅक्टर, एक यारी मशीन संच, 5 हॅड्रोलिक टेम्पो ट्रक असा एकूण 35 लाख 03 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

या संशयीत आरोपींविरोधात गुन्हा दाखल -

संतोश ब्रम्हदेव आरकिले (वय 35 वर्ष रा. शेगांव धुमाला ता. पंढरपूर जि. सोलापूर),समीर लक्ष्मण मशाळ( वय 25 वर्ष रा. आश्टे ता. मोहोेळ जि. सोलापूर), रामचंद्र अर्जून नरोटे (वय 20 वर्ष रा. आश्टे ता. मोहोळ जि. सोलापूर), समाधान शेकप्पा शिवशरण (वय 26 वर्ष), आप्पा श्रीरंग मोरे (वय 46 वर्ष रा. नजीकपिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर ), दिनकर अंबादास वाघमोडे,( वय 25 वर्षे रा. नजीकपिंपरी ता. मोहोळ जि. सोलापूर ), विलास हुकूम वाघमोडे वय (30 वर्ष ), सदाषिव महादेव वाघमोडेे (वय 45 वर्ष),पोपट षिवाजी वाघमोडे (वय 21 वर्ष), बजरंग शिवाजी मोरे (वय 52 वर्ष), उत्तम बलभिम वाघमोडे (वय 50 ),दत्तात्रय प्रल्हाद चवरे( वय 40 वर्ष, रा. मोहोळ) , बापू खरात (रा. आश्टे ता. मोहोळ), राहूल खरात, वाहन मालक अच्युत गायकवाड (रा. मोहोळ), सिकंदर धोत्रे (रा. मोहोळ), दीपक बाळासाहेब झेंडगे (रा. मलकाची हिंगणी ता. मोहोळ जि. सोलापूर) या संशयीत आरोपींविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सफौ ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी बजावली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.