सोलापूर - सोलापूरची ९०० वर्षाची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर गड्डा यात्रेवर कोरोना महामारीचे संकट घोंगावत आहे. शासनाने घातलेल्या नियम अटीनुसार यात्रा पार पाडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र यात्रा झाली पाहिजे यावर पंच कमिटी ठाम आहे. राज्यसरकने यात्रेबाबतचा चेंडू जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर सोपवला आहे.
पारंपरिक रितीरिवाजानुसार परवानगी मागितली
सोलापूरची सिद्धेवर गड्डा यात्रेला ९०० वर्षांची परंपरा आहे. ही यात्रा म्हणजे सिद्धरामेश्वराच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा असतो. यामध्ये अनेक विधी आहेत. योगदंडाचे प्रतिक असलेल्या योगदंडाची मिरवणूक, पूजा पाठ याचे रितिरिवाज आहेत. यात खंड पडू नये, यासाठी ही यात्रा झालीच पाहिजे, यावर पंच कमिटी ठाम आहे.
नियमाने यात्रा भरविण्याचे आदेश
सोलापूरची गड्डा यात्रा व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधीही सहमत आहेत. यासाठी त्यांनीही शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. शासनाचे या यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाला नोटिफिकेशन आले आहे. नियम आणि अटीच्या पूर्ततेवर जिल्हा प्रशासनाने यात्रा भरवावी, असे आदेश राज्य सरकडून मिळाले आहेत. त्यामुळे जवळपास नियम आणि अटींवर यात्रा साजरी होईल, अशी अशी आशा निर्माण झाली आहे.
'मला यामध्ये राजकारण करायचे नाही'
जशी आजपर्यंतची यात्रा झाली, तशी यंदाचीही यात्रा पारा पाडताना शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यात्रेतील चार प्रमुख सोहळे पाडावेत, अशी मागणी भाविकांतून जोर धरत आहे. आम्हीदेखील पाठपुरावा करत आहोत. यामध्ये राजकारण करणारे, कोणाच्या खांद्यावर कोण बंदूक मारत आहे, हे मला माहित नाही, असे म्हणत महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला आमदार प्रणिती शिंदे यांनी चिमटा काढला आहे.