ETV Bharat / state

Diwali 2021 : दिवाळीवर महागाईचे सावट; इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमतीत वाढ - solapur special news

दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पहावयास मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. रेडिमेड कापड, फराळाचे साहित्य आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये गर्दी पहावयास मिळत आहे. पण, या दिवाळीवर महागाईचे सावट निर्माण झाले आहे. फ्रीज, टीव्ही, मोबाईल आदी वस्तूंच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष केतन शहा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Nov 2, 2021, 10:58 AM IST

सोलापूर - दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली असताना बाजारपेठांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी पहावयास मिळत आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. रेडिमेड कापड, फराळाचे साहित्य आदी वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये गर्दी पहावयास मिळत आहे. पण, या दिवाळीवर महागाईचे सावट निर्माण झाले आहे. फ्रीज, टीव्ही, मोबाईल आदी वस्तूंच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याची माहिती यावेळी इलेक्ट्रॉनिक दुकानदार संघटनेचे अध्यक्ष केतन शहा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

दिवाळीवर महागाईचे सावट

हप्त्यावर किंवा कर्ज करून वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर

इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये टीव्ही, फ्रीज, स्मार्ट फोन, मायक्रोवेव्ह ओव्हन, आटा चक्की आदी वस्तू खरेदी करण्यास ग्राहकांचा अधिक कल दिसून येत आहे. पण, ऐन दिवाळीत या वस्तूच्या किंमतीत वाढ झाल्याने रोख रक्कम ग्राहकांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे दुकानदारांनी फायनान्स, कर्जावरवर या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. पण, व्याजासह त्या वस्तू आणखीन महाग मिळतात.

कोरोनानंतर महागाईचा फटका

कोरोनाची दाहकता कमी होत असून बाजारपेठा हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. पेट्रोल दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा थेट परिणाम प्रत्येक वस्तूंच्या किंमतीवर होत आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने ट्रान्सपोर्टचे दरही वाढत आहेत. तसेच आयात व्यवस्थामध्ये केंद्र सरकारने बदल केल्याने विदेशी वस्तूही महागल्या आहेत.

दहा ते पंधरा टक्के दरवाढ

कोरोना, टाळेबंदीनंतर आता सर्व सुरळीत सुरू असून अनेक जण दिवाळीची जय्यत तयारी करत आहेत. अनेकजण दिवाळी काहीतरी नवीन वस्तू खरेदीसाठी बाजारपेठात जातात. ई-कॉमर्स वेबसाईट्सही या संधीचा फायदा घेत आहेत. काही वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे दहा ते पंधरा टक्क्यांनी वस्तु महाग झाल्या आहेत. या वाढलेल्या महागाईमुळे कोट्यवधीची उलाढाल असलेल्या सोलापूर शहरात माहागाईचे सावट निर्माण झाले आहे.

हे ही वाचा - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नगरसेवक-आमदार भिडले, पालकमंत्री दत्ता भरणेंनी केली मध्यस्थी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.