ETV Bharat / state

सोलापूरमध्ये स्वच्छतेचा प्रश्न गंभीर, अनेक भागात ड्रेनेज व्यवस्था नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात - Solapur Latest News

शहर मैलामुक्त करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडे फक्त तीनच टँकर उपलब्ध आहेत. यामुळे सोलापूरकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्याचा वेळेवर निचरा होत नसल्याने शहरातील नागरिकांना निरोगी राहणे अवघड झाले आहे. शहरातील विविध भागात सांडपाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था जोडली गेली नसल्यामुळे, आजसुद्धा शहरात उघड्या गटारी पाहायला मिळतात.

Solapur Latest News
ड्रेनेज व्यवस्था नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
author img

By

Published : Dec 16, 2020, 8:53 PM IST

सोलापूर- शहर मैलामुक्त करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडे फक्त तीनच टँकर उपलब्ध आहेत. यामुळे सोलापूरकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे. सांडपाण्याचा वेळेवर निचरा होत नसल्याने शहरातील नागरिकांना निरोगी राहणे अवघड झाले आहे. शहरातील विविध भागात सांडपाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था जोडली गेली नसल्यामुळे, आजसुद्धा शहरात उघड्या गटारी पाहायला मिळतात. त्यामुळे शहरात रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

28 वर्षांपासून हद्दवाढ भागात ड्रेनेज व्यवस्थाच नाही

1992 साली शहरालगत असलेल्या 11 ग्रामपंचायतींचे विलीनीकरण करून, त्यांचा समावेश सोलापूर महानगरपालिकेत करण्यात आला होता. हा भाग हद्दवाढ म्हणून ओळखला जातो. या परिसरात गेल्या 28 वर्षांपासून ड्रेनेजची अपुरी व्यवस्था आहे. या भागात अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र ड्रेनेज व्यवस्था नसल्याने त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे स्वछ भारत अभियानाचा डंका वाजवला जातो, तर दुसरीकडे अपुऱ्या कामगार व्यवस्थेमुळे स्वछ भारत अभियाची थट्टा होत आहे. नीलम नगर, नइ जिंदगी, विजापूर नाका, आदी हद्दवाढ भागातून सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी जास्त प्रमाणात अर्ज येत असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ड्रेनेज व्यवस्था नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

सेफ्टी टॅंक सफाई कामगारांचा तुटवडा

शहरात सेफ्टी टॅंक स्वछ करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने, स्वच्छतेच्या कामात दिरंगाइ होत आहे. शहराच्या मलमूत्र निस्सारण विभागात फक्त 12 ते 15 कर्मचारी काम करतात. सोलापूर शहराची लोकसंख्या 10 ते 12 लाख असून, एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी फक्त तीन टॅंकर आणि काही मोजकेच सफाई कामगार असल्यामुळे शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी देखील या तीन टँकरवरच आहे.

ड्रेनेज पाईपलाईन देखील तुंबलेलेच

शहरातील ड्रेनेज पाईपलाईन देखील तुंबलेल्या अवस्थेत आहे. शहरातील मुख्य चौकांत सदैव या ड्रेनेजच्या झाकणातून घाण पाणी बाहेर येत असते. शहरातील नागरिकांना या पाण्यामधून ये-जा करावी लागते. तसेच या पाण्यामधून वाहन चालवताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते.

ड्रेनेज चेंबर स्वच्छ करताना कामगारांचा मृत्यू

सोलापूर शहरात 1993 पासून ते आजपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ करताना 5 सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर सत्यप्पा बनसोडे, अर्जुन सुरवसे, महादेव गायकवाड अशी या कामगारांची नावे आहेत. मात्र अद्यापही या कामगारांच्या कुटुंबियांना मदतनिधी मिळालेला नाही.

सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी 1500 ते 2000 रुपयांचा दर

सोलापूर महानगरपालिकेच्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीने सेफ्टी टॅंक स्वच्छ करण्यासाठी अर्ज केला, तर त्याला 800 रुपये भरून सेफ्टी टॉंक स्वच्छ करून दिल्या जातो. मात्र सेफ्टी टँक स्वच्छता करणाऱ्या टँकरची संख्या कमी असल्यामुळे, नागरिक या टँकर चालकांना पैशाचे आमिश दाखवून सेफ्टी टॅंक स्वच्छ करून घेतात. यासाठी नागरिकांना दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.