ETV Bharat / state

शासनासोबत चर्चा करुनच आषाढी वारी - सोहळा प्रमुख - palakhi

दरवर्षी आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पायी चालत पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. पण, यंदा संचारबंदीमुळे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत वारी काढू, अशी भूमिका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी घेतली आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : May 6, 2020, 1:57 PM IST

Updated : May 6, 2020, 2:45 PM IST

सोलापूर - आषाढी वारीची शेकडो वर्षांची परंपरा खंडीत होणार नाही, याची काळजी घेतली जाईल अशी भूमिका पालखी सोहळा प्रमुखांनी घेतली आहे. शासन जे काही नियम घालून देईल त्या नियमांचे पालन केले जाईल. शासनासोबत चर्चा केल्यानंतरच वारीबद्दलची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी सांगितले आहे.

माहिती देताना राणा महाराज वासकर

आषाढी वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो दिंड्या पायी चालत पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यामध्ये प्रमुख सात पालखी सोहळे आहेत. संत तूकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा देहू वरून निघतो तर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा आळंदी येथून निघतो. संत मुक्ताई, सोपानदेव, संत गजानन महाराज पालखी सोहळा यासह हजारो दिंड्या पंढरपुरात येत असतात.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांची आज व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पालखी सोहळा पार पाडण्याची भूमिका सर्वांनी घेतली आहे. पालखी सोहळ्यासोबत कमीत कमी लोक ठेऊन किंवा शासन जे नियम घालून देईल त्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत पालखी सोहळे हे ठरलेल्या तारखेनूसार प्रस्थान करतील अशी भूमिका जाहीर केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 13 जून रोजी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा हा ठरलेल्या तारखेनूसार निघतील, अशी भूमिका आज महाराज मंडळीनी घेतलेली आहे.

महाराष्ट्राचा आध्यात्मिक आणि संस्कृती सोहळा समजल्या जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे. तरीही वारकरी संप्रदायाच्या प्रथा आणि परंपरेला धरून शासनाच्या सहकार्याने यावर्षीचा आषाढी पालखी सोहळा काढण्यावर ठाम असल्याची भूमिका संत ज्ञानेवारी महाराज पालखी सोहळयाचे प्रमुख मानकरी आणि राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे अध्यक्ष राणा महाराज वासकर यांनी मांडली.

आषाढी पालखी सोहळा तोंडावर आला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा आषाढी पालखी सोहळा निघणार का या विषयी संभ्रम कायम आहे.
या संदर्भात आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख महाराज मंडळींची आज पंढरपुरात व्हिडिओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये राणा महाराज वासकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा परंपरेला धरुन काढणे शक्य असल्याची भूमिका मांडली.

यावेळी वासकर महाराज म्हणाले, आषाढी पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा यापुढेही कायम सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही प्रमाणात सावट निर्माण झाले आहे. असे असले तरी पालखी सोहळा मोठ्या थाटात आणि डामडौलात काढण्याचा आमचा विचार आहे. यावेळी सरकारकडून जे नियम आणि अटी घालून दिल्या जातील त्या प्रमाणे आम्ही पालखी सोहळा काढू, असे वासकर महाराज यानी सांगितले.

हेही वाचा - सोलापुरात वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी रांगा... सकाळपासूनच मोठी गर्दी

Last Updated : May 6, 2020, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.