सोलापूर - निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून दररोज पाणी पुरवठा करू, असे सांगितले जाते. मात्र सोलापुरातील जलसंकट थांबवण्यासाठी आत्ताच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सोलापूर शहराला नियमित विमानसेवेपेक्षा नियमित पाणीपुरवठ्याची गरज असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अतिशय गोंधळात अर्थसंकल्प मंजूर झाला आणि पाणी पुरवठ्याचा विषय बाजूला राहिला. या विषयाचे गांभीर्य सर्वांना माहित असावे म्हणून अभ्यास करून महेश कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना महत्वाच्या विषयांबाबत गांभीर्य नसून गाफीलपणा केला जात आहे, असे आरोप करत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.
सोलापूर शहराला विमानसेवेपेक्षा नियमित पाणी पुरवठा गरजेचा - The city of Solapur needs regular water supply
सोलापूर शहराला नियमित विमानसेवे पेक्षा नियमित पाणी पुरवठ्याची गरज असल्याचे मत विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता.

सोलापूर - निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून दररोज पाणी पुरवठा करू, असे सांगितले जाते. मात्र सोलापुरातील जलसंकट थांबवण्यासाठी आत्ताच व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. सोलापूर शहराला नियमित विमानसेवेपेक्षा नियमित पाणीपुरवठ्याची गरज असल्याचे मत माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक महेश कोठे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेत झालेल्या अर्थसंकल्पात हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अतिशय गोंधळात अर्थसंकल्प मंजूर झाला आणि पाणी पुरवठ्याचा विषय बाजूला राहिला. या विषयाचे गांभीर्य सर्वांना माहित असावे म्हणून अभ्यास करून महेश कोठे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना महत्वाच्या विषयांबाबत गांभीर्य नसून गाफीलपणा केला जात आहे, असे आरोप करत पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.
TAGGED:
सोलापूर महानगरपालिका जलसंकट