ETV Bharat / state

KCR in Solapur : मुख्यमंत्री केसीआर यांची सोलापुरात रॉयल एन्ट्री; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - केसीआर सोलापुरात दाखल

तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची सोमवारी सायंकाळी ग्रँड इन्ट्री सोलापुरात झाली आहे. बालाजी हॉटेल मालक राम रेड्डी यांनी विठ्ठल मूर्ती देऊन केसीआर यांचे स्वागत केले. हजारो गाड्यांचा लवाजमा शहरात दाखल झाला आहे. केसीआर हे मंगळवारी पंढरपूरला जाणार आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jun 26, 2023, 7:18 PM IST

Updated : Jun 26, 2023, 7:36 PM IST

केसीआर सोलापुरात दाखल

सोलापूर - शहरातील आसरा चौक येथील बालाजी सरोवर या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये बीआरएसचे शेकडो कार्यकर्ते, नेते व आमदार मुख्यमंत्र्यांसोबत दाखल झाले आहेत. सोलापूर शहर पोलीस व तेलंगाणा पोलिसांचा मोठा पोलीस फौजफाटा हॉटेलमध्ये तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सोलापूर पोलीस व तेलंगाणा पोलीस कोणालाही आत प्रवेश देत नाहीत. त्यामुळे पोलिसांची व बीआरएस पक्षाच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की झाली आहे.

शहरात एक किलोमीटरपर्यंत ट्राफिक जाम - तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे जवळपास 600 गाड्यांचा फौजफाटा घेऊन सोलापुरात दाखल झाले आहेत. आसरा चौक येथील पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवरमध्ये केसीआर मुक्कामी आहेत. केसीआर यांच्या वाहनासोबत जवळपास 600 वाहने असल्याने एक किलोमीटरपर्यंत ट्राफिक जाम झाले होते. सोलापुरातील दाखल होताना बोरामणी नाका, मार्केट यार्ड परिसर, शांती चौक, सिव्हिल चौक, सात रस्ता, गांधी नगर, आसरा चौक या ठिकाणाहून ताफा पुढे सरकताच वाहतूक कोंडी झाली होती. सायंकाळच्या सुमारास शाळा सुटण्याची वेळ असताना शहरात वाहतूक मोठी होती. त्यात केसीआर यांचा ताफा पुढे सरकताच वाहतूक विस्कळीत झाली होती.

हॉटेलला आले राजकीय छावणीचे स्वरूप - सोलापूर शहरातील अनेक हॉटेलला राजकिय छावणीचे स्वरूप आले होते. बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये बीआरएस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाल्याने फाईव्ह स्टार हॉटल देखील राजकीय कार्यालयसारखे दिसून आले. तेलंगाणा मुख्यमंत्री केसीआर याची इन्ट्री पाहून सोलापूरकरांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते.

मंगळवारी केसीआर पंढरपुरात - मंगळवारी केसीआर हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह आमदार, मंत्री यांना घेऊन पंढरपूरला जाणार आहेत. तिथे ते विठ्ठ्लाची पूजा करून दर्शन घेणार आहेत. केसीआर यांच्या पंढरपूर भेटीने राज्यातील राजकारण तापले आहे. केसीआर हे सोमवारी सकाळीच हैदराबादमधून सोलापूरसाठी रवाना झाले होते. रस्त्यात अनेक ठिकाणी बीआरएसच्या कार्यकर्त्यांनी केसीआर यांचे जंगी स्वागत केले होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी केसीआर हे सोलापुरात दाखल झाले आहेत.

हेही वाचा -

  1. Sugar Factory Politics : साखरपट्ट्यात केसीआर यांची एन्ट्री; काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का देणार?
  2. KCR in Pandharpur : केसीआर मंत्रिमंडळासह पंढरपुरात; टॅक्सी पश्चिम महाराष्ट्रात धावणार का?
  3. KCR in Solapur : वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी केसीआर यांना परवानगी नाही, केसीआर यांची जिल्हा प्रशासनावर नाराजी
etv play button

Last Updated : Jun 26, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.