ETV Bharat / state

दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा थेट सोलापूर महापालिकेत - सोलापूर शिक्षक मोर्चा

आता काही दिवसांवर दिवाळी आली आहे, तरी देखील सुटी मिळत नसल्याने नाराज झालेल्या शिक्षकांनी थेट महापालिकेत ठिय्या आंदोलन केले.

teachers-agitation-at-municipal-corporation-for-diwali-holidays-directly-in-solapur
दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा थेट महापालिकेत
author img

By

Published : Nov 7, 2020, 7:03 PM IST

सोलापूर- कोरोना महामारी सुरू झाल्यापासून कोविड सर्वेसाठी शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली आहे. सर्व शाळांतील शिक्षक सर्वे करत घरोघरी जाऊन नागरिकांच्या तपासण्या करत आहेत. पण शिक्षकांना सुटी दिली जात नाही. आता काही दिवसांवर दिवाळी आली आहे. तरी देखील सुटी मिळत नसल्याने नाराज झालेल्या शिक्षकांनी थेट महापालिकेत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत इथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली होती.

मोर्चेकरांच्या प्रतिक्रिया
कोरोना काळात आरोग्य विभाग, पोलीस विभाग आणि शिक्षक विभाग यांच्यावर भरपूर ताण निर्माण झाला आहे. हे तिन्ही विभाग कोरोना वारीयरची भूमिका अतिशय चोखपणे बजावत आहेत. यांच्या सुटींचा मात्र खोळंबा झाला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक सणाच्या आनंदावर पाणी पडले आहे. सोलापूर महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी शहरातील व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी ड्युटी लावली आहे. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक व महापालिका शिक्षक व खासगी शाळांतील शिक्षक कार्यरत आहेत. इतर विभागाचे देखील कर्मचारी कार्यरत आहेत. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्ट्या आहेत तसेच दुसरा शनिवार आणि रविवार अशा सुट्या आहेत. या शिक्षकांना नाहीत. ही बाब अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या मनात खटकत होती. आम्हाला देखील कोरोना ड्युटीमधून साप्ताहिक सुटी देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक करत होते; परंतु यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात होते.आज शनिवारी खासगी शाळांतील शिक्षक कोविड ड्युटी साठी गेले असता, आरोग्य केंद्रातील अनेक महापालिका कर्मचारी शनिवार असल्याने सुटीवर होते. त्यामुळे याला वाचा फुटली. एकमेकांच्या संपर्कात असलेल्या शिक्षकांनी फोन करून थेट महापालिकेत येण्यास सांगितले आणि अचानकपणे मोर्चाच्या स्वरूपात दाखल होत, ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी धाव घेत समजूत काढण्याच्या प्रयत्न केला. माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर यांनी देखील मध्यस्थी करून तोडगा काढू, असे तोंडी आश्वासन दिले. यावेळी खासगी शाळांतील शिक्षकांनी उद्यापासून कोरोना ड्युटीवर येणार नाही, अशी भूमिका घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.