ETV Bharat / state

शिक्षक पत्नी अन् मुलाची हत्या करून शिक्षक पतीची आत्महत्या - solapur crime news

Teacher Suicide Killing Wife and Son : शिक्षक पतीनं आपल्या शिक्षक पत्नीचा व पाच वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे. यानंतर शिक्षक पतीनंही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नातू, सून आणि मुलाचा मृतदेह पाहून वृद्ध आई-वडिलांना जबर धक्का बसलाय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 3:01 PM IST

Updated : Nov 28, 2023, 3:43 PM IST

सोलापूर Teacher Suicide Killing Wife and Son : बार्शी शहरातील (Barshi News) उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीनं आपल्या शिक्षक पत्नीचा गळा कापून व आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या तोंडावर उशी ठेवून हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या (Teacher Suicide in Barshi) केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानं बार्शी शहरासह सोलापूर जिल्ह्यात (Solapur News) मोठी खळबळ उडाली. अतुल सुमंत मुंढे (वय ४०), तृप्ती अतुल मुंढे (वय ३५), ओम अतुल मुंढे (वय ५) असे त्या मृत तिघांची नावे आहेत.

असा प्रकार आला उघडकीस : बार्शी पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहितीनुसार, अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती मुंढे या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. दोघेही उपळाई रोडवरील आपल्या घरात वरच्या मजल्यावर राहत होते. खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई- वडील राहतात. वरच्या मजल्यावरील कोणीही खाली न आल्यानं अतुल यांच्या आई-वडिलांनी मंगळवारी सकाळी वर जाऊन पाहिलं तेव्हा ही घटना उघडकीस आली. सून रक्ताच्या थारोळ्यात, नातू निपचित अवस्थेत पडलेलं आणि मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून अतुलच्या आई- वडिलांना जबर धक्का बसला.

कारण अद्यापही अस्पष्ट - प्राथमिक माहितीनुसार, तृप्ती मुंढे यांचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत होता, तर पाच वर्षीय ओम याचा मृत्यू गुदमरून झाला असावा असा अंदाज आहे. अतुल मुंढे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे सर्व विदारक दृश्य पाहून अतुलच्या आई- वडिलांनी हंबरडा फोडला. आजूबाजूच्या नागरिकांनी व नातेवाईकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत बार्शी पोलिसांना कळवण्यात आले. बार्शी शहर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिकचा तपास सुरू आहे. या घटनेनं बार्शी शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

हेही वाचा -

  1. दारुड्यांनी गाड्या अडवून लुटलं; विरोध करणाऱ्या माजी सैनिकाचा पत्नी मुलांसमोर भररस्त्यात खून
  2. 'नीट' प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची कोटामध्ये आत्महत्या
  3. ७ महिने, १४ खून...एकच पॅटर्न! ४० ते ७० वर्षे वयोगटातील महिला निशाण्यावर; सिरियल किलिंगच्या घटनांनी दहशत

Last Updated : Nov 28, 2023, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.