ETV Bharat / state

खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच तिवरे धरण फुटले; जलसंपदा मंत्र्यानंतर आता जलसंधारण मंत्र्याचा जावईशोध - सोलापूर

पुण्यातील मुठा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटल्याचे अजब तर्कट मांडले होते. त्यानंतर आता तिवरे धरण प्रकरणी जलसंधारण मंत्र्यांनी हा जावईशोध लावला आहे.

जलसंधारण मंत्री तानाजी सावंत
author img

By

Published : Jul 4, 2019, 8:27 PM IST

सोलापूर - शिवसेनेशी निगडीत ठेकेदार तिवरे धरणफुटीला कारणीभूत नाही. धरण परिसरात असलेल्या खेकड्यांचा प्रादुर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे धरण फुटल्याचा जावईशोध राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी लावला आहे.

सोलापूर येथे बोलताना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत

युवासेना नेते आदित्या ठाकरे जलसंपदाव विभागाच्या आष्टी उपसासिंचन योजनेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी हे अजब वक्तव्य केले.

रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे धरण फुटले. त्याला जबाबदार कोण? असा सवाल सर्वत्र उपस्थित केला जात आहे. तसेच शिवसेनेच्या आमदाराने हे धरण बांधले आहे. याप्रकरणी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निकृष्ट बांधकामाची चौकशी करून कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. महाजनांचा रोख शिवसेनेकडे होता काय? असा प्रश्न सावंत यांना विचारला होता. त्यावर त्यांनी हे अजब उत्तर दिले.

गेल्या वर्षी २८ सप्टेंबरला पुण्यातील मुठा कालवा फुटला. त्यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे मुठा कालवा फुटला, असे अजब वक्तव्य केले होते.

Intro:सोलापूर : शिवसेनेशी निगडित ठेकेदार तिवरे धरणफुटीला कारणीभूत नसून धरण परिसरात असलेल्या खेकड्यांचा प्रादुर्भाव अन नैसर्गिक आपत्तीमुळं धरण फुटल्याचा निर्वाळा राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी दिलाय.

Body:रत्नागिरी जिल्ह्यात तिवरे धरण फुटलं त्याला जबाबदार कोण याबाबत स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात आलीय.हे धरण शिवसेनेशी संबंधित ठेकेदाराने दुरुस्त केलं आहे.त्यामुळं
शिवाय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी निकृष्ट कामाबाबत जबाबदारी निश्चित करून कडक कारवाईचा इशारा दिलाय.त्यामुळं त्यांचा रोख सेनेकडे होता काय असा सवाल केल्यावर मंत्री सावंत यांनी हा सावध खुलासा केलाय...

Conclusion:युवा सेना नेते आदित्य ठाकरे हे जलसंपदा विभागाच्या आष्टी उपसा सिंचन योजना भाग 2 च्या उदघाटनासाठी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.त्यावेळी जलसंधारणमंत्री आणि जिल्ह्याचे सेना संपर्कप्रमुख तानाजी सोलापूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी त्यांनी विश्रामगृहावर इटीव्ही भारतशी बोलताना ही सावध प्रतिक्रिया दिलीय...यावरून सेना-भाजप युतीचे नेते परस्परांच्या बचावासाठी प्रयत्न करीत असल्याचं स्पष्ट होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.