ETV Bharat / state

सुधाकरपंत परिचारकांच्या अस्थींचे शोकाकूल वातावरणात झाले चंद्रभागेत विसर्जन...

सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी सुधारकरपंत परिचारक यांच्या अस्थींचे विसर्जन पंढरपुरातील चंद्रभागा नदीत शोकाकूल वातावरणात करण्यात आले.

pandharpur
अस्थींचे विसर्जन करतानाचे छायाचित्र
author img

By

Published : Aug 19, 2020, 5:40 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांचे अस्थिकलश हे अंतिम दर्शन प्रदक्षिणा मार्गावरील परिचारक वाड्यासमोर ठेवण्यात आली होती. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील अनेक नेते व कार्यकर्त्यांनी दर्शन घेत आदरांजली वाहिली. त्यानंतर जय श्री हरीच्या गजरात सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थींचे आज (19 ऑगस्ट) चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले.

पंढरपूर व माळशिरस तालुक्यात काही गावात बुधवारी (19 ऑगस्ट) अस्थिकलश अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी कारखान्यावरुन वेगवेगळ्या ग्रामीण भागात अस्थिकलश दर्शनाचे नियोजन करण्यात आले होते. आठ गटनिहाय अस्थिकलशाचे नियोजन केले होते. यामधे पंढरपूर, देगाव, वाखरी, भाळवाणी, करकंब गटातील 16 गावात अस्थिकलशाचे दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. प्रत्येक गावात 45 मिनिटे अस्थिकलशाचे दर्शन देण्यात आले. विविध गटातील अस्थिकलश पंढरपूर येथील अर्बन बँकेत एकत्र करण्यात आल्या. त्यानंतर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास चंद्रभागा नदीत या सर्व अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी परिचारक कुटुंबाच्या वतीने मिलिंद परिचारक उपस्थित होते.

दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या हयातीत पंढरपूर तालुक्याच्या राजकारण, साखर कारखाना, सूत गिरणी, अशा विविध सहकारी संस्थांवर पदे भूषवली होती. तसेच ते माजी आमदारही होते. पुण्यातील रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असताना त्यांच्या मृत्यू झाला. मृत्यूसमयी ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

हेही वाचा - सहकार, समाजकारणातील मार्गदर्शक नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.