ETV Bharat / state

कोरोनाचे अहवाल लवकर द्या, आमदार सुभाष देशमुखांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना - कोरोना अपडेट्स सोलापूर

कोराना संभाव्य रुग्णाचा स्वॅब चाचणीकरता घेतला जातो. याचा अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी. खासगी दवाखान्यात जर कोरानाग्रस्त रुग्ण आढळला तर लगेच दवाखाना सील करू नये, सिव्हील प्रशासनाबद्दल अनेकांच्या तक्रारी येत आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा सिव्हीलमध्ये बसवावेत. स्वत धान्य दुकानातून रेशनची व्यवस्था सुरळीत करावी, यासह विविध सूचना आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या आहेत.

कोरोनाचे अहवाल लवकर द्या
कोरोनाचे अहवाल लवकर द्या
author img

By

Published : May 29, 2020, 2:51 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एखाद्या व्यक्तीचा स्वॅब घेतल्यानंतर त्याचा अहवाल लवकर प्राप्त झाल्यास योग्य ती काळजी घेण्यासाठी तसेच इतरांवर उपचार करण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे कोरोनाचा अहवाल लवकर मिळावा अशी सूचना माजी सहकारमंत्री आणि दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

कोराना संभाव्य रुग्णाचा स्वॅब चाचणीकरता घेतला जातो. याचा अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी, अशा सूचना माजी सहकारमंत्री आणि आमदार सुभाष देशमुख यांनी केल्या आहेत. खासगी दवाखान्यात जर कोरानाग्रस्त रुग्ण आढळला तर लगेच दवाखाना सील करू नये, सिव्हील प्रशासनाबद्दल अनेकांच्या तक्रारी येत आहेत, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा सिव्हीलमध्ये बसवावेत. स्वत धान्य दुकानातून रेशनची व्यवस्था सुरळीत करावी, यासह विविध सूचना आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना केल्या आहेत.

आमदार देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन कोरानाबाबतचा आढावा घेतला. यावेळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोराना रुग्णांची वाढती संख्या, आणि त्याच्या स्वॅब स्टेटचा अहवाल येण्यास लागणारा तीन ते चार दिवसांचा अवधी याबाबत जाणून घेतले. उशीरा प्राप्त होणाऱ्या रिपोर्ट्समुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे स्वॅब टेस्ट लवकर घेऊन त्याचा अहवाल तत्काळ मिळण्याची सोय करावी अशा सूचना देशमुख यांनी केल्या आहेत.

खाजगी दवाखान्यात रुग्ण सापडल्यास दवाखाना सील ना करता योग्यपणे काळजी घ्यावी. व तेथील डॉक्टरांना विश्वासात घेऊन काम करावे. सिव्हीलमधील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय व्यवस्थित काम करतात की नाही, हे पाहण्यासाठी विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. आशा वर्कर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांचे चार महिन्यांचे वेतन थकले आहे, ते त्वरित मिळावे. रेशन धान्य दुकानातून अजूनही सुरळीत धान्य पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घालून लोकांना धान्य व्यवस्था सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, असेही देशमुख यांनी म्हटले आहे. यासोबत, सोलापूर शहरातील प्रत्येक वार्डात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची सोय करावी. शहरातील रेल्वे ग्राऊंडवर कोव्हीड रुग्णालय उभे करण्यासाठी विचार करावा, असेही आमदार देशमुख यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.