ETV Bharat / state

'माढ्याची बारामती' करायचं काय झालं ? सहकार मंत्र्यांचा पवारांना सवाल

शरद पवारांच्या विरोधात सुभाष देशमुख हे भाजपचे उमेदवार असतील अशी चर्चा झडत आहे.

author img

By

Published : Feb 20, 2019, 11:47 PM IST

Updated : Feb 21, 2019, 8:29 AM IST

सुभाष देशमुख

सोलापूर - २००९ ला माढ्यातून लोकसभा निवडणूक लढताना शरद पवार यांनी माढ्याची बारामती करू असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाचे पुढे काय झाले? असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी उपस्थित केला. माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार लढणार हे निश्चित झाले आहे. याबद्दलचा प्रश्न विचारल्यावर देशमुख यांनी पत्रकारांना उत्तर देताना हे वक्तव्य केले.

शरद पवारांच्या विरोधात कोण उभे राहणार याची चर्चा जोर धरत आहेत. वेगवेगळ्या नावांची चर्चा असली तरी सुभाष देशमुख यांना पर्याय नाही, असा सूर भाजपच्या गोटातून निघत आहे. २००९ च्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांना पवारांच्या विरोधात अडीच लाख मते मिळाली होती. देशमुख यांना उमेदवारीबाबत विचारले असता, याचा निर्णय पक्ष घेईल असे सावध उत्तर त्यांनी दिले.

पुण्यातल्या घोषनेनंतर पवार उद्या माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्या गावानजीक पिंपळनेर येथे कार्यकर्ता मेळावा घेत आहेत. शिवाय निमगावात निवडक लोकांशी बंद खोलीत चर्चाही करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्र्यांना हा सवाल उपस्थित करून पवारांना अडचणीत टाकणाऱ्या दुखऱ्या नशेवर बोट ठेवले आहे, अशी चर्चा होत आहे.

Intro:सोलापूर : दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2009 ला माढ्यातून लोकसभा निवडणूक लढताना शरद पवार यांनी माढ्याची बारामती करू असं आश्वासन दिलं होतं.या अश्वासनाचं पुढं काय झालं ? असा सवाल सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी उपस्थित केलाय.....
माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नांव निश्चित झाल्यानंतर त्यांच्यासमोर भाजपचा उमेदवार कोण याची चर्चा आता जोर धरत आहे. वेगवेगळ्या नांवाची चर्चा असली तरी सुभाष देशमुख यांना पर्याय नाही असा सूर भाजपच्या गोटातून निघत आहे.त्यावर देशमुख यांना विचारल्यावर त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय.

Body:पवारांच्या विरोधात 2009 ला अडीच लाख मतं घेणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनाचं पुन्हा मैदानात उतरविले जाईल असे आडाखे लावले जात आहेत.त्याचा अंदाज आल्याने भाजप बूथ कमिटीच्या बैठकांना सहकार मंत्र्यांनी हजेरीही लावलीय. तयातच पक्ष मी कुठून लढावं याचा निर्णय पक्ष घेईल असा सावध पवित्रा ही देशमुख यांनी घेतलाय.
त्यावर गत दहा वर्षांपूर्वीच्या आश्वासनांच्या अनुषंगाने सहकारमंत्री देशमुख यांना विचारल्यावर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलाय. एवढचं नाहीतर देशाचा पंतप्रधान माढ्यातून होईल असं वक्तव्यही पवारांनी केलं होतं.असाही उपरोधिक टोला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शरद पवारांना लागावलाय...

Conclusion:मी कुठून लढावं ते पक्षाला माहीत असल्याच सांगत पवारांवर शाब्दिक वार करण्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी टायमिंग साधलंय...पुण्यातल्या घोषनेनंतर पवार उद्या माढ्यात आ.बबनराव शिंदे यांच्या गावा नजीक पिंपळनेर येथे कार्यकर्ता मेळावा घेत आहेत. शिवाय निमगावांत निवडक लोकांशी बंद खोलीत चर्चाही करणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर सहकारमंत्र्यांना हा सवाल उपस्थित करून पवारांना अडचणीत टाकणाऱ्या दुखऱ्या नशेवर बोटं ठेवलंय...
Last Updated : Feb 21, 2019, 8:29 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.