ETV Bharat / state

एमपीएससी आंदोलन प्रकरणी आमदार पडळकरांना अटक; माळशिरसमध्ये पडसाद

author img

By

Published : Mar 12, 2021, 10:18 AM IST

Updated : Mar 12, 2021, 12:41 PM IST

एमपीएससीने परीक्षा रद्द केल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. याचे पडसाद जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उमटले .

आमदार पडळकरांना अटक; माळशिरसमध्ये पडसाद
आमदार पडळकरांना अटक; माळशिरसमध्ये पडसाद

पंढरपूर - नियोजित एमपीएससी परीक्षा दोन दिवसांवर आली असतानाच ठाकरे सरकारकडून पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा नियोजित वेळेत व्हावी, यासाठी पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. या आंदोलनाचे नेतृत्व करत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही सहभाग नोंदवला. त्यानंतर पुणे पोलिसांनी आमदार पडळकरांना रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार पडळकरांना अटक केल्यानंतर माळशिरस तालुक्यात खुडूस व विझोरी गावात त्याचे पडसाद उमटले. येथील तरुणांनी टायर जाळून या कारवाईचा निषेध व्यक्त केला.

आमदार पडळकरांना अटक; माळशिरसमध्ये पडसाद

महाविकास आघाडी सरकारचा विद्यार्थ्यांकडून निषेध -

माळशिरस तालुक्यातील खुडूस व विझोरी गावामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना अटक झाल्यानंतर गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास टायर जाळून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारने लवकरात लवकर स्पर्धा परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.

राज्य सरकारने तत्काळ परीक्षा घ्यावी, विद्यार्थ्यांची मागणी

14 मार्च रोजी होणारी स्पर्धा परीक्षा राज्य सरकारने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रद्द केली. पुणे येथे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. गोपीचंद पडळकर यांनी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांनी जे मुद्दे मांडले ते बरोबर आहेत. महाविकास आघाडी सरकारने सहा वेळा स्पर्धा परीक्षा रद्द केल्या आहेत. अशाप्रकारे परीक्षा रद्द करणे चुकीचे असल्याचे मत विद्यार्थ्यांनी यावेळेस व्यक्त केले. तसेच राज्य सरकारने तत्काळ स्पर्धा परीक्षा द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली

Last Updated : Mar 12, 2021, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.