ETV Bharat / state

कोरोना वाढतोय! पंढरपूर तालुक्यातील 28 गावात कडक निर्बंध - सोलापूर लेटेस्ट न्यूज

पंढरपूर तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुर्वी तालुक्यातील 21 गावात जास्त रुग्ण संख्या असल्याने कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. तसेच तालुक्यातील आणखी 7 गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 10 पेक्षा जास्त असल्याने संबधित गावांत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.

Strict restrictions in 28 villages in Pandharpur taluka
कोरोना वाढतोय! पंढरपूर तालुक्यात 28 गावांत कडक निर्बंध
author img

By

Published : Aug 31, 2021, 8:50 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी तसेच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी ज्या गावांत 10 किंवा 10 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण असतील ते संपूर्ण गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यातील 21 गावात कडक निर्बंध असून आणखी सात गावांत रुग्ण वाढल्याने 01 सप्टेंबर पासून 14 दिवस कडक निर्बंध जाहिर करण्यात आले असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

तालुक्यातील आणखी सात गावांमध्ये निर्बंध -

तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुर्वी तालुक्यातील 21 गावात जास्त रुग्ण संख्या असल्याने कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. तसेच तालुक्यातील आणखी 7 गावांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 10 पेक्षा जास्त असल्याने संबधित गावांत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये तालुक्यातील वाखरी, तिसंगी, शेळवे, सोनके, सिध्देवाडी, कान्हापुरी, पिराची कुरोली या गावांत कडक निर्बंध जाहीर करण्यात आले असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी -

कोरोना बाधित गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद राहतील. विशेष तपासणी मोहिमेतंर्गत तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यापारी, फळे व भाजीपाला विक्रेते, दुध विक्रेते याच्यांसह इतर व्यावसायिकांची आठवड्यातून कोरोना चाचणी करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीने मुख्य रस्ता सोडून इतर सर्व मार्ग बंद करावेत. यासाठी आवश्यक तिथे जास्त कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी. गावांमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची नोंद ठेवावी.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उपलब्ध -

आरोग्य विभागाने मुबलक प्रमाणात औषधसाठा व वैद्यकीय साहित्य उपलब्ध ठेवावे. तसेच ग्रामस्तरीय समितीच्या मदतीने सर्व नागरिकांच्या चाचण्या तसेच लसीकरण करुन घ्यावे. बाधित रुग्णांना घरीच उपचारासाठी न ठेवता तात्काळ कोविड केअर सेंटर, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर तसेच डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ठेवावे अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी यावेळी दिल्या. तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही गुरव यांनी यावेळी केले.

हेही वाचा - COVISHIELD चा दुसरा डोस चार आठवड्यानंतर की 84 दिवसांनी..? निर्णय दोन सप्टेंबरला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.