ETV Bharat / state

Women's Day : विमलताईंच्या जिद्दीला सलाम.. तीन मुलींना केले उच्चशिक्षीत - सोलापूर जिल्हा बातमी

जमदाडे यांनी तीन मुलींना उच्च शिक्षण दिले आहे. त्यापैकी 2 मुलींची लग्नं केली आहेत. जमदाडे दररोज कुर्डूवाडीला ये- जा करतात. 19 मे 1995 ला विमल यांचे पती चंद्रकात जमदाडे यांचे निधन झाले. त्यावेळी पतीच्या निधनाने दुखा:ला कवटाळत न बसता त्यांनी कामाला सुरुवात केली.

Solapur
Vimal Jamdade
author img

By

Published : Mar 8, 2020, 1:37 PM IST

सोलापूर - जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी असे कर्तबगार महिलांबद्दल अभिमानाने म्हटले जाते. या विधानाचा प्रत्यय कुर्डूवाडी आगाराच्या वर्कशॉपमध्ये पाहायला मिळाला. विमल चंद्रकात जमदाडे (पानगाव ता. बार्शी) या महिलेने जिद्दीने संघर्षमय प्रवास करत पतीच्या अपघाती निधनानंतर वर्कशॉपमध्ये काम करत खडतर परिस्थितीवर मात केली आहे.

जमदाडे यांनी तीन मुलींना उच्च शिक्षण दिले आहे. त्यापैकी 2 मुलींची लग्नं केली आहेत. जमदाडे दररोज कुर्डूवाडीला ये-जा करतात. 19 मे 1995 ला विमल यांचे पती चंद्रकात जमदाडे यांचे निधन झाले. त्यावेळी पतीच्या निधनाने दुखा:ला कवटाळत न बसता त्यांनी कामाला सुरुवात केली. काही महिन्यातच विमल यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अनुकंपावर पतीच्या जागी नोकरी मिळाली. काही वर्षे सोलापूर आगारात काम केल्यानंतर त्या अनेक वर्षापासून सफाई कामगारासह मोटार मॅकनिकची कामे करत आहेत.

हेही वाचा - विविध मागण्यांसाठी सोलापुरात महिलांचे 'जेलभरो' आंदोलन

एसटीचे अवजड टायर काढणे, जॅक लावून पुन्हा टायर बसवणे, ग्रेस लावून सेटिंग करणे, एसटी पत्रा वेल्डिंग यासह अन्य सर्वच कामे जमदाडे सहजरीत्या करतात. जमदाडे यांनी कष्ट, मेहनत अन् जिद्दीच्या जोरावर अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे. त्यांनी परिस्थितीशी दोन हात करत आपल्या कर्तृत्वाने महिलांसमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.

विमल जमदाडे यांनी पतीच्या अपघाती निधनानंतर तीन मुलींच्या शिक्षणाला कसलीही कमतरता जाणवू दिली नाही. तिन्ही मुलींना एसटी आगारातील कामाच्या जोरावर त्यांनी उच्चशिक्षीत केले. कल्पना या मोठ्या मुलीला एम.बी.ए तर मिनाक्षीने एम.एस.सी शिक्षण घेतले आहे. या दोघींचे लग्नं झाले आहे. तसेच सोनालीने नुकतेच एम.कॉमची पदवी संपादन केली आहे.

तर प्रत्येक महिलेने सक्षमपणे पायावर उभे राहयला हवे. संकुचित विचार न करता कोणतेही काम न लाजता करावे. परिस्थितीशी दोन हात करत कामात सातत्य ठेवल्यास प्रत्येक महिला समृध्द होऊ शकते, असे विमल जमदाडे यांनी सांगितले.

हेही वाचा - #WomensDay: ग्रामीण अर्थकारण सक्षम करणाऱ्या अनिता माळगे यांची यशोगाथा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.