ETV Bharat / state

Ranjitsinh disale : डिसले गुरुजींची राज्यस्तरीय चौकशी! राज्य शिक्षण सचिव व आयुक्तांकडून होणार चौकशी

रणजितसिंह डिसले ( Ranjitsinh disale ) यांच्याकडे मुख्याध्यापकाचा युजर आयडी, पासवर्ड होता. तो स्वतः वापरून त्या काळातील वेतन घेतले आहे. वास्तविक पाहता वेतनासाठी 'डायट'कडून हजेरी रिपोर्ट घेऊन वेतन काढणे अपेक्षित होते.

रणजितसिंह डिसले
रणजितसिंह डिसले
author img

By

Published : Jul 18, 2022, 12:00 PM IST

सोलापूर - आंतरराष्ट्रीय ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले ( Ranjitsinh disale ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांची भेट घेतल्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेच्या ( Solapur Zilla Parishad ) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिसलेंवर राज्य शासन स्तरावरूनच कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. गैरवर्तन व शिस्तभंग करूनही रणजितसिंह डिसले सोलापुरातील ( Solapur ) वरीष्ठ अधिकाऱ्यांची बदनामी करत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. डिसलेच्या चौकशींचे अहवाल आता राज्य शिक्षण सचिव आणि राज्य शिक्षण आयुक्तांकडे पाठवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे.

रणजितसिंह डिसलेचं पितळ उघड - प्रतिनियुक्तीवर नेमणूक असतानाही सतत 3 वर्षे 2017 ते 2020 या काळात गैरहजर राहिल्याची माहिती चौकशी अहवालातुन समोर आली आहे. तत्कालीन शिक्षण अधिकारी संजय राठोड आणि सध्याचे शिक्षण अधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या काळात झालेल्या चौकशी समित्यांच्या अहवालात त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे.

लॉगइन आयडीचा गैरवापर - रणजितसिंह डिसले यांच्याकडे मुख्याध्यापकाचा युजर आयडी, पासवर्ड होता. तो स्वतः वापरून त्या काळातील वेतन घेतले आहे. वास्तविक पाहता वेतनासाठी 'डायट'कडून हजेरी रिपोर्ट घेऊन वेतन काढणे अपेक्षित होते. 3 वर्षांत अनेकदा चूका करून अधिकाऱ्यांनीच आपल्याकडे पैसे मागितल्याचा थेट आरोप त्यांनी जानेवारी महिन्यात केला होता.

थेट राज्यपालाना निमंत्रण - जिल्हा प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी राज्यपालांना शाळेला भेट देण्याचे निमंत्रण पाठविले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची कुचंबणा झाली होती. कारण राज्यपाल येणार असल्याने जिल्हा प्रशासनाला मोठी तयारी करावी लागली होती. पण ऐनवेळी राज्यपालांचा दौरा रद्द झाला.

कारवाई अटळ असल्याने राजीनामा दिला - जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन केला असता, डिसले गुरुजी फोन देखील उचलत नव्हते. अशा बाबींमुळे त्यांच्याबद्दलचा रोष वाढला होता. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्वीच्या चौकशी समितीचा अहवाल दुसरी समिती नेमून पडताळला. त्यात डिसले गुरुजींच्या आणखी काही चूका समोर आले. त्यानंतर निश्चितपणे कारवाई होणार असल्याची जाणीव डिसलेंना झाली होती. त्यामुळे त्यांनी 7 जुलैला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे राजीनामा सोपविला.

डिसले 34 महिने गैरहजर असल्याची माहिती वेळीच का लक्षात आली नाही - माढा तालुक्यातील परितेवाडी येथील झेडपी शाळेवरील उपशिक्षक रणजितसिंह डिसले हे ग्लोबल अवॉर्ड प्राप्त होण्यापूर्वी त्यांची प्रतिनियुक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर ( डायट ) होती. जवळपास 34 महिन्यांत एकच दिवस त्यांनी तेथे हजेरी लावली. तरीपण, तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर 3 वर्षांत कारवाई केली नाही, हे विशेष.शिक्षण खात्याला 34 महिन्यात गैरहजर असल्याची माहिती वेळीच का लक्षात आली नाही. हे देखील विचार करण्यासारखे आहे. दोनवेळा चौकशी झाल्यानंतर ते परस्पर गैरहजर राहिल्याचे चौकशीत नमूद झाले आहे.

राज्य सरकार कडून कोणतेही आदेश किंवा सूचना नाहीत - जिल्हा प्रशासनकडून कारवाई होणार असल्याची खात्री झाल्यानंतर डिसले यांनी 'राजीनाम्याचा' अस्त्र वापरला आहे. क्यूआर कोड शिक्षण पध्दती, ग्लोबल टिचर पुरस्कार, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजेची मागणी आणि आता राजीनामा, यामुळे डिसले गुरुजी पुन्हा राज्यभर पोहचले. त्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आपली व्यथा व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या भेटीने कारवाई थांबेल, असा विश्वास त्यांना होता. पण, सरकारकडून जिल्हा परिषदेला किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अद्याप कोणतेही आदेश किंवा सूचना मिळालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विधीमंडळात केले मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.