ETV Bharat / state

ST Employees : आम्ही कुठल्याही संपात सहभागी होणार नाही; एसटी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया - गुणरत्न सदावर्ते

ST Employees On Gunaratna Sadavarte: सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गुणरत्न सदावर्ते(Gunaratna Sadavarte) यांनी आज दिलेल्या एसटी बंदच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळला नाही. गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees Reaction) सोलापूरात दिली आहे.

ST Strike
एसटी सेवा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 9:51 PM IST

प्रतिक्रिया देताना एसटी कर्मचारी बलभीम पाखरे

सोलापूर ST Employees On Gunaratna Sadavarte : दिवाळीचा बोनस, सातवा वेतन आयोगानुसार वेतन अशा विविध मागण्याकरीता एसटी कर्मचारी पुन्हा संपावर जाणार असं गुणरत्न सदावर्ते यांनी हाक दिली होती. महाविकास आघाडीची सरकार असताना, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा महिने संप पुकारून एसटी सेवा बंद ठेवली होती. पुन्हा एकदा एसटी संप होणार अशी माहिती, गुणरत्न सदावर्ते यांनी दिली होती. मात्र गुणरत्न सदावर्ते यांच्या आवाहनाला सोलापूर एसटी कर्मचाऱ्यांनी कसल्याही प्रकारचा पाठिंबा दर्शवला नाही. उलट गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक केली आहे. आता यापुढे कसल्याही प्रकारच्या संपात सहभागी होणार नसल्याची माहिती, एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employees Reaction) दिली आहे.

मागील सहा महिन्यांच्या संपात आर्थिक नुकसान झाले : महाविकास आघाडीची सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, आणि गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाला पाठिंबा देत नेतृत्व देखील केलं होतं. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करावे. कर्मचाऱ्यांना राज्य शासना प्रमाणे वेतन द्यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने वेतनात वाढ देत एसटी आंदोलन संपविलं होतं. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही. सरकार कोणतीही असो, एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होणारच अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. उलट गेल्या संपात सहा महिने कामावर न गेल्याने विना वेतन सुट्टी झाली. जवळपास दोन ते अडीच लाख रुपये बुडाले. तसेच निवृत्त होताना देखील या सहा महिन्यांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलं गाजरं : महाविकास आघाडीची सरकार असताना, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं. सत्ता परिवर्तन झाले तर, एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरण करू. राज्यात सत्ता परिवर्तन होऊन दीड वर्ष झाले. एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारकडे म्हणणे सादर केले नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळ करून एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेवर देखील कब्जा केला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी माहिती देताना सांगितलं की, गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना फक्त गाजर दिला आहे.

हेही वाचा -

  1. Sangli News: चालू एसटीत चालकाला आली चक्कर; वाहकाने धाडसाने गाडी थांबवत वाचवले, 30 प्रवाशांचे प्राण
  2. ST Strike in Maharashtra : ज्या लोकप्रतिनिधींनी एसटीच्या संपाला पाठिंबा दिला, त्यांनीच फिरवली एसटीकडे पाठ
  3. संपानंतर लालपरी सुसाट: एसटीने काही दिवसात कमावले 'एवढे' कोटी रुपये, एसटी कर्मचारी संपानंतरची मोठी कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.