ETV Bharat / state

करमाळ्यातील 12 बोटीसह 19 पोहणाऱ्यांचे पथक सांगलीत करतेय बचावकार्य - सांगली बचावकार्य

पुराने वेढलेल्या सांगलीकरांच्या मदतीसाठी करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण तर कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले. पुण्याचे विभागीय आयुक्त दिपक म्हैसेकर यांच्या निर्देशानुसार हे पथक रवाना करण्यात आले आहे. सकाळपासून त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे

करमाळा तालुक्यातील 12 बोटी 19 पोहणाऱ्यांचे पथक सांगलीमध्ये बचावकार्य करत आहे
author img

By

Published : Aug 9, 2019, 9:51 PM IST

सोलापूर - सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन, सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यातील 12 बोटी 19 पोहणारे बचावकार्य करत आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर आणि कोंढार चिंचोली येथील उत्कृष्ट पोहणाऱ्या 19 व्यक्ती आणि 12 बोटी निवडून सांगली येथे मदतकार्यासाठी पाठवण्यात आलेल्या आहेत.

करमाळा तालुक्यातील 12 बोटी 19 पोहणाऱ्यांचे पथक सांगलीमध्ये बचावकार्य करत आहे

या बोटी आणि 19 जणांनी बचाव व मदत कार्यात मोठी कामगिरी केली आहे. अजूनही त्यांचे मदत कार्य सुरूच आहे, अशी माहिती करमाळ्याचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली. करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण तर कोंढार चिंचोली येथील ५ बोटी, ५ मच्छीमार युवकांचे एक पथक सांगली येथे पाठवण्यात आले.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी चांगले बोटी चालवणारे व पट्टीचे पोहणारे व्यक्ती शोधून काढले. पथकातील सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करून सांगली येथे पाठवण्यात आले. त्यांच्या सोबत तलाठी व कोतवाल यांनाही पाठवण्यात आले आहे. सकाळपासून त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे. पूर परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे बचावकार्य चालणार आहे.

Intro:mh_sol_03_karmala_help_in_sangali_flood_7201168

करमाळा तालुक्यातील 12 बोटी आणि 19 पट्टीचे पोहणारे करतायेत सांगलीत बचावकार्य

सोलापूर-
सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना बाहेर काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील 12 बोटी आणि उजनी धरणात पोहणारे पट्टीचे असलेले 19 जण हे बचावकार्य करीत आहेत.
सांगली येथे मदतीसाठी करमाळा येथून हे सर्व जण गेले आहेत. Body:पुणे विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर व कोंढारचिंचोली येथील चांगले पट्टीचे पोहणारे 19 व्यक्ती व 12 बोटी निवडून सांगली येथे मदतकार्यास पाठवण्यात आलेल्या आहेत. या बोटी आणि 19 जणांनी बचाव व मदत कार्यात मोठी कामगिरी केली असून अजूनही त्यांचे मदत कार्य सुरूच आहे. अशी माहिती करमाळा तहसिलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी दिली असून करमाळा बचाव पथक सांगली येथे दाखल झाले असून या पथकाने मदत कार्यास सुरुवात केली आहे.

सांगली येथे महापुराने वेढलेल्या गावांतील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी व वाहत्या पाण्यातून बचाव मोहीम राबवण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार करमाळा तालुक्यातील कंदर येथील ७ बोटी व १४ जण व कोंढार चिंचोली येथील ५ बोटी व ५ जण असे पट्टीचे पोहणारे मच्छीमार युवकांचे एक पथक आज सायंकाळी सांगली येथे पाठवण्यात आले.
पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या निर्देशानुसार सांगली भागात बचाव व मदत करण्यासाठी पथक पाठवण्याचे सांगितले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी चांगले बोटी चालवणारे व पट्टीचे पोहणारे व्यक्ती शोधून काढले. त्यांना मदतीसाठी जायचे असे सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. कंदर ता करमाळा येथील १४ जणांची यासाठी निवड करण्यात आली. तर सुव्यवस्थितीत असणाऱ्या १० सीटर ७ बोटी निवडण्यात आल्या. कोंढारचिंचोली येथील ५ बोटी व ५ जण निवडण्यात आले. पथकातील सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करून सांगली येथे पाठवण्यात आले. त्यांच्या सोबत तलाठी व कोतवाल यांनाही पाठवण्यात आले आहे. सकाळपासून त्यांनी मदतकार्यास सुरुवात केली आहे.. सांगलीत मदतकार्यात सुरुवात करण्यात आली आहे पण पूरपरिस्थिती पाहता मदतीसाठी आणखी यंत्रणेची गरज होती. त्यासाठी हा पर्याय वापरण्यात आला आहे.
या मदतीसाठी असणाऱ्या पथकात तलाठी उमेश बनसोडे, तलाठी संजय शेटे, कोतवाल नितीन हत्तीकर व रामभाऊ अभिमान चव्हाण, धनाजी नागनाथ माने, शंकर यशवंत माने, लखन तुकाराम चव्हाण, राहुल सर्जेराव जाधव, आगर महादेव शिरतोडे, दशरथ वाल्मिक बोडरे, संतोष पोपट माने, राहुल अरुण चव्हाण, दत्तात्रय रामभाऊ चव्हाण, धनाजी विठ्ठल माने, बंडू दत्तू बोडरे, सखाराम सर्जेराव मासे, नागनाथ दिगंबर माने या १४ जणांचा व कोंढारचिंचोली येथील लहू भोई, संजय चमरे, शिवाजी चमरे, शंकर जाधव, कोंडीबा सालमपूरे ५ जण असे एकूण १९ जणांचा या पथकात समावेश आहे. पूरपरिस्थिती पूर्ववत होईपर्यंत हे बचावकार्य चालणार आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.