सोलापूर - करमाळा तालुक्यातील केम गावातील पहिली मुलगी भारतीय सैन्यात भरती झाली आहे. सोनल राजेंद्र तळेकर, असे या मुलीचे नाव आहे. सोनलची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम गावामधून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी आहे. त्यामुळे पंचक्रोशीत तिचे कौतुक होत आहे.
सोनल ही पदवीधर आहे. तिचे दहावीपर्यतचे शिक्षण उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये झाले आहे. सोनल जिद्दीने केंद्रीय राखीव दलात भरती झाली आहे. तर सोनलच्या वडिलांचे शिक्षण फक्त तिसरीपर्यंत झाले आहे. ते शेती करतात, असे असतानाही मुलगा व मुलगी यात भेदभाव न करता त्यांनी सोनलचे शिक्षण पूर्ण केले. तर सोनलनेही धाडसी निर्णय घेऊन देशसेवा करण्याचे ठरऊन केंद्रीय सैन्य दलात भरती होऊन आमच्या कुटूंबाची मान उंचावली असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Women's Day : विमलताईंच्या जिद्दीला सलाम.. तीन मुलींना केले उच्चशिक्षीत
माझी बहिण सैन्यात भरती झाल्यामुळे मला आनंद वाटत आहे. तर हा आनंद पूर्ण कुटूंबाला, गावाला व तालुक्याला आहे. असेच प्रत्येक मुलीने आपल्या कुटूंबाच्या इच्छा पूर्ण कराव्यात, अशी आशा व्यक्त सोनलच्या बहिण अश्विनी तळेकर हिने व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सभापती शेखर गाडे, माजी सरपंच अजित तळेकर, सरपंच आकाश भोसले, उपसरपंच नागनाथ तळेकर, राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्यध्यापक मनोज तळेकर, महेश तळेकर, सागर दोंड, आनंद शिंदे, सचिन बिचितकर, महावीर तळेकर, अच्युत काका तळेकर, मिलिंद नरखेडकर, संजय जाधव, अरुण काळे यांनी सोनलचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा - माढा नगरपंचायत ठरली देशात पहिली; घरावर कुटुंबप्रमुखाच्या जागेवर महिलांच्या नावाच्या 'पाट्या'