ETV Bharat / state

वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळेल्या मुलाने मित्रांच्या मदतीने केली जन्मदात्याची हत्या - son killed his father

टेंभुर्णी येथील बेकरी व्यापारी संजय मारुती काळे यांचा दोन दिवसापूर्वी खून झाला होता. खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची नोंद टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात झाली होती.शेवटी या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

son killed his father fed up with his immoral relationship
वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून मुलानेच केली जन्मदात्याची हत्या
author img

By

Published : Jul 29, 2020, 12:11 AM IST

सोलापूर - टेंभुर्णी येथील बेकरी व्यापारी संजय मारुती काळे यांचा दोन दिवसापूर्वी खून झाला होता. खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची नोंद टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात झाली होती. शेवटी या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, पोटच्या मुलानेच जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, वडिलांचे बाहेर एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यावरून वडील घरातील सदस्यांना त्रास देत होते. त्यामुळे मित्रांच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची माहिती मुलगा आकाश संजय काळे याने पोलिसांना दिली.

पोलिसांनी या प्रकरणी आकाश संजय काळे याच्यासह लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (२७) आणि अलाऊद्दीन ऊर्फ आलम बासु मुलाणी (३३) दोघे राहणार सुर्ली, तालुका माढा असे एकूण तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - मद्यपी चढला मोबाईल टाॅवरवर...म्हणाला, हा तर दहीहंडीचा सराव

पोटच्या मुलाने वडिलांची हत्या केल्याची माहिती समोर येताच परिसरातील नागरिक-ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत होते. दोन मित्राच्या मदतीने खून केल्याचे उघड झाले आहे. या खुनात आकाश याने रघुनाथ बंदपट्टे याला 7 हजार रुपये देखील दिले होते. याबाबत उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी अधिक माहिती दिली. यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. मुलगा आकाश हा फिर्याद देतानाच पोलिसांनी मुलावर संशय घेतला होता. त्याची कसून चौकशी केली असता, त्यानेच वडिलांचा खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.