सोलापूर - सासूबाई या महापौर पदासाठी निवडणूकीला उभ्या असताना जावयांने सासूला मतदान करण्याऐवजी तटस्थ राहणे पसंत केले. राजकारणात नाते संबंध वेगळे आणि राजकारण वेगळे याचाच प्रत्यय सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीवेळी पाहायला मिळाला. .
महापौर पदासाठी भाजपकडून श्रीकांचना यन्नम यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. निवडणूक लागल्यानंतर मतदान प्रक्रिया होत असताना श्रीकांचना यन्नम यांचे जावई नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी मात्र सासूला मतदान न करता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली.
हेही वाचा - सोलापूरच्या महापौरपदी भाजपच्या श्रीकांचना यन्नम तर उपमहापौरपदी राजेश काळे यांची निवड