ETV Bharat / state

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अटक; क्राईम ब्राँचची कारवाई

उपमहापौर राजेश काळे यांनी सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ केली होती. याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार होते. आज त्यांना अटक करण्यात आली.

Rajesh Kale
राजेश काळे
author img

By

Published : Jan 5, 2021, 1:24 PM IST

सोलापूर - महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना फोन करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी उपमहापौर राजेश काळे विरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर राजेश काळे फरार होते. आज (मंगळवारी) सकाळी क्राईम ब्राँचच्या अधिकाऱ्यांनी राजेश काळे यांना अटक केले आहे.

सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक व उपमहापौर असलेल्या राजेश काळे यांनी सोलापूर महानगरपालिकेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मोठे वादळ उठले होते. उपमहापौरांच्या विरोधात सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राजेश काळे हटाव, अशी हाक देत आंदोलन केले होते.

भाजपाकडून मिळाला होता २४ तासांचा अल्टीमेटम -

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक व सध्याचे उपमहापौर राजेश काळे यांना पक्षाने २४ तासांच्या आत खुलासा मागितला होता. बेशिस्त वर्तन केल्याच्या अनेक तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. तसेच त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे पक्षाबद्दल समाजात गैरसमज निर्माण होत आहेत. उपमहापौर या पदावर असताना प्रशासनाकडून गंभीर स्वरूपचा गुन्हा दाखल होणे म्हणजे हे गंभीर आहे. याप्रकरणी राजेश काळे यांनी २४ तासात खुलासा करावा, अशी नोटीस भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी काढली होती.

काय होते प्रकरण -

राजेश काळे हे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करतानाची ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्यामध्ये ते माजी मंत्र्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी फिरते शौचालय मागत असल्याची माहिती समोर आली आहे. ते माजी मंत्री कोण, असा सवालदेखील निर्माण झाला आहे.

पुण्यातही आहेत राजेश काळेच्या नावे गुन्हे दाखल -

पुण्यातील सांगवी येथील एका फ्लॅटविक्री प्रकरणात काळे यांना मे २०२०मध्ये अटक करण्यात आली होती. उपमहापौरांनी पुण्यातील सांगवी येथील एकच फ्लॅट चार ते पाच जणांना विकला आणि त्यांच्याकडून पैसे घेतले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काळे यांच्या विरुद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी काळे यांच्या साथीदारांनाही आगोदरच अटक करण्यात आलेली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.