ETV Bharat / state

'संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान' - भारताचे संविधान

यावेळी अध्यक्ष कांबळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. शेती आणि पशुपालन या विषयावर विविध प्रकारे भाष्य करत त्यांनी ग्रामीण भागातील जीवनशैलीवरही प्रकाश टाकला.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे
author img

By

Published : Jan 19, 2020, 1:50 PM IST

Updated : Jan 19, 2020, 2:28 PM IST

सोलापूर - भारताच्या संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला असल्याची भावना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी व्यक्त केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडीची प्रक्रिया नुकतीच पार पडली. त्यामध्ये करमाळा तालुक्यातील केमचे अनिरुद्ध कांबळे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. त्या पार्श्वभूमीवर करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत केम येथे आयोजित शिक्षण परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

'संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान'

यावेळी अध्यक्ष कांबळे यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आहे. शेती आणि पशुपालन या विषयावर विविध प्रकारे भाष्य करत त्यांनी ग्रामीण भागातील जीवनशैलीवरही प्रकाश टाकला. तसेच केममधील अजित तळेकर यांनी अध्यक्ष पदासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख यावेळी त्यांनी केला. अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेत त्यांनी निभावलेल्या किंगमेकरच्या भूमिकेचा वारंवार उल्लेख उपस्थितांकडून करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज प्रशासनामध्ये उच्च पदावर काम करताना दिसून येतात. ग्रामीण भागातील शिक्षण हे अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी पंचायत समितीद्वारे विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी यावेळी दिले.

माळशिरस तालुक्यातील व्याख्याते प्रशांत सरूडकर यांनी 'शिक्षण काल आज आणि उद्या'या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर, करमाळा पंचायत समिती चे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, माजी सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ देशमुख, यांच्यासह करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी राजाराम भोंग, आदि अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Intro:Body:करमाळा - संविधानामुळे मिळाला अध्यक्षपदाचा बहुमान - अनिरुद्ध कांबळे जिल्हा परिषद अध्यक्ष सोलापूर

Anchor - सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी आपला आत्तापर्यंतचा जीवनप्रवास उलगडताना आपले शालेय जीवनातील आठवणी व भावनिक प्रसंग मांडले.शेती व पशुपालन या विषयावर विविध प्रकारे भाष्य करत त्यांनी ग्रामीण भागातील जीवनशैली यावर प्रकाश टाकला.तर संविधानामुळे आपणाला अध्यक्षपदासाठी आरक्षित झालेल्या जागेवर अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला असे प्रतिपादन कांबळे यांनी केले. करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेच्या प्रसंगी ते केम येथे बोलत होते.

Vo - अध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल त्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी आयोजित करण्यात आला होता.केममधील अजित तळेकर यांनी अध्यक्ष पदासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांचा उल्लेख यावेळी करण्यात आला. तसेच अध्यक्ष पदाच्या निवडीच्या प्रक्रियेत त्यांनी निभावलेल्या किंगमेकर च्या भूमिकेचा वारंवार उल्लेख उपस्थितांकडून करण्यात आला. करमाळा पंचायत समिती चे सभापती गहिनीनाथ ननवरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज प्रशासनामध्ये उच्च पदावर काम करताना दिसतात. ग्रामीण भागातील शिक्षण हे अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी पंचायत समिती द्वारे विशेष प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले . माळशिरस तालुक्यातील व्याख्याते प्रशांत सरूडकर यांनी 'शिक्षण काल आज आणि उद्या'या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर, करमाळा पंचायत समिती चे सभापती गहिनीनाथ ननवरे, उपसभापती दत्तात्रय सरडे, माजी सभापती शेखर गाडे, जिल्हा परिषद सदस्य निलकंठ देशमुख, राणी वारे,बिभीषण आवटे,पंचायत समिती सदस्य अतुल पाटील, केमचे माजी सरपंच अजित तळेकर,सरपंच आकाश भोसले, उपसरपंच नागनाथ तळेकर,संजय देवकर, करमाळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी अधिकारी राजाराम भोंग, केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश कांबळे, कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख बाबासाहेब शेख ,केम जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव तळेकर, घोटी शाळेचे विषयशिक्षक दत्तात्रय रंदवे, सहशिक्षक तुकाराम तळेकर, , साईनाथ देवकर, शेलगाव (वांगी)शाळेचे मुख्याध्यापक संजय वाघमारे, सखाराम राऊत,भालचंद्र गावडे, राजकुमार वासकर,केशव देवकर ,अरूण चौगुले आदि उपस्थित होते.

बाईट - 1 - अनिरुद्ध कांबळे ( अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषद ) ( साउंड बाईट )

बाईट - 2 - गहिनीनाथ ननवरे ( सभापती पंचायत समिती करमाळा ) ( साउंड बाईट )

करमाळा प्रतिनिधी शितलकुमार मोटेConclusion:
Last Updated : Jan 19, 2020, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.