ETV Bharat / state

महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व समजावून सांगा - सीईओ डॉ. राजेंद्र भारूड - मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड

मासिक पाळी व्यवस्थापन ही बाजू महिलांना समजावून सांगण्यासाठी महिला प्रशिक्षक निर्माण होणे अपेक्षित आहे. चांगल्या दर्जाचे मास्टर ट्रेनर तयार झाले पाहिजेत. यासाठी जिल्ह्याचा आराखडा बनवण्याची गरज असल्याचेही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले.

मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळेत उपस्थित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड
author img

By

Published : Mar 26, 2019, 11:58 AM IST

सोलापूर - जिल्ह्यात महिलांच्या आरोग्यासाठी आराखडा तयार करणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याकडे करायला दुर्लक्ष नको. प्रत्येक महिलांना सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व समजावून सांगण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत साईप्रसाद बॅन्क्वेटमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

मासिक पाळी व्यवस्थापन ही बाजू महिलांना समजावून ceसांगण्यासाठी महिला प्रशिक्षक निर्माण होणे अपेक्षित आहे. चांगल्या दर्जाचे मास्टर ट्रेनर तयार झाले पाहिजेत. यासाठी जिल्ह्याचा आराखडा बनवण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

सोलापूर जिल्ह्यात व्यापक प्रमाणात महिलांच्या आरोग्यासाठी मोहिम हाती घेण्यात येत आहे. ८ ते १० वी मधील मुली, महिला यांच्यापर्यंत पोहोचून सॅनिटरी नॅपकीनचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मनुष्य बळ विकास तज्ज्ञ इंदिरा परब यांनी मासीक पाळी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. त्याबाबत अंधश्रद्धा बाळगू नका. स्वच्छता हा घटक महत्वाचा आसल्याचे परब म्हणाल्या.

प्रशिक्षक हेमांगी जोशी यांनी महिलांना विविध गटकार्य करून शोषक साहित्याचा वापर आणि त्याची विल्हेवाट लावण्याची पध्दती यावर चर्चा केली. आता माझी पाळी हा लघुपट दाखवण्यात आला. हे कार्य करण्यासाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मोहिमेस चांगले यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Intro:R_MH_SOL_01_26_SANITORY_NAPKIN_TRENING_S_PAWAR
महिलांना सॅनिटरी नॅपकीन चे महत्व समजावून सांगा- सिईओ डाॅ. राजेंद्र भारूड
सोलापूर -सोलापूर जिल्ह्यात महिलांच्या आरोग्यासाठी आराखडा तयार करणेत आहे. महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको. प्रत्येक महिलांना सॅनिटरी नॅपकीन चे महत्व समजावून सांगा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. डाॅ. राजेंद्र भारूड यांनी केले.Body:सोलापूर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत साईप्रसाद बॅन्क्वेट मध्ये मासीक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सिधुदूर्ग च्या मनुष्य बळ विकास तज्ञ इंदिरा परब, प्रशिक्षक हेमांगी जोशी, मनुष्य बळ विकास तज्ञ शंकर बंडगर, लेखाधिकारी डाॅ. अर्चना कसवेकर, पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली व्हटे,समाजशास्त्र तज्ञ महादेव शिंदे, स्वच्छता तज्ञ प्रशांत दबडे प्रमुख उपस्थित होते.
जिल्ह्यात महिलांच्या आरोग्यासाठी चांगली सुरूवात झाली आहे. मासीक पाळी व्यवस्थापन ही बाजू महिलांना समजून सांगण्यासाठी महिला प्रशिक्षक निर्माण होणे अपेक्षित आहे. चांगल्या दर्जाचे मास्टर ट्रेनर तयार झाले पाहिजेत. यासाठी जिल्ह्याचा आराखडा बनवा. प्रत्येक महिलांना सॅनिटरी नॅपकीन चे महत्व समजावून सांगा असे आवाहन सिईओ डाॅ. भारूड यांनी केले
प्रास्तविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. सोलापूर जिल्ह्यात व्यापक प्रमाणात महिलांच्या आरोग्यासाठी मोहिम हाती घेण्यात येत आहे. ८ ते १० वी मधील मुली, महिला यांचे पर्यंत पोहचून सॅनिटरी नॅपकीन चे महत्व पटवून सांगणेत येत आहे. मनुष्य बळ विकास तज्ञ इंदिरा परब यांनी मासीक पाळी व आव्हाने याबाबत मार्गदर्शन केले. याबाबत मासिक पाळी ही नैसर्गिक क्रिया आहे. मासिक पाळी बाबत अंधश्रद्धा बाळगू नका. स्वच्छता हा घटक महत्वाचा आसल्याचे परब यांनी सांगितले. प्रशिक्षक हेमांगी जोशी यांनी महिलांना विविध गटकार्य करून शोषक साहित्याचा वापर व त्याची विल्हेवाट लावण्याची पध्दती यांवर चर्चा करवून घेतली. आता माझी पाळी हा लघुपट दाखविणेत आला. हे कार्य करणेसाठी महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणेत आला. सिधुदूर्ग जिल्हात या मोहिमेस चांगले यश आले आहे. असेही त्यांनी सांगितले. या प्रशिक्षणासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सहाय्यीका, ग्रामीण जीनन्नोन्नती अभियान तालुका समन्वयक, बीआरसी व सीआरसी, विस्तार अधिकारी शिक्षण सर्व महिला कर्मचारी हे सहभागी झाले. Conclusion:नोट- सोबत फोटो जोडले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.