ETV Bharat / state

ZP CEO on Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींना सोलापूर जिल्हापरिषद सर्वतोपरी मदत करणार - सीईओ दिलीप स्वामी

रणजितसिंह डिसले यांना सहा महिन्यांच्या सुट्टीसाठी शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार ( Dr Kiran Lohar report ) यांनी नियमावर बोट ठेवून रजा नामंजूर केली होती. तसेच गेल्या तीन वर्षांपासून काय काम केले, त्याबाबत अहवालही तयार केला आहे. या सर्व प्रकरणी डिसले गुरुजींनी माध्यमांसमोर येत वरिष्ठांवर वेगवेगळे आरोप केले होते. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Varsha Gaikwad on Ranjitsinh Disale  ) दखल घेतली.

author img

By

Published : Jan 22, 2022, 7:54 PM IST

Updated : Jan 22, 2022, 8:29 PM IST

सीईओ दिलीप स्वामी

सोलापूर- आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले गुरुजींच्या पीएचडी आणि अमेरिकन दौऱ्यावरून राज्यभरात मोठे रणकंदन उठले होते. त्यावर आता पडदा पडला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी ( Dilip Swami on Ranjitsinh Disale issue ) यांनीदेखील शनिवारी सायंकाळी डिसले गुरुजींना सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ( Solapur Zilla Parishad help to Ranjitsinh Disale ) सांगितले.

रणजितसिंह डिसले यांना सहा महिन्यांच्या सुट्टीसाठी शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार ( Dr Kiran Lohar report ) यांनी नियमावर बोट ठेवून रजा नामंजूर केली होती. तसेच गेल्या तीन वर्षांपासून काय काम केले, त्याबाबत अहवालही तयार केला आहे. या सर्व प्रकरणी डिसले गुरुजींनी माध्यमांसमोर येत वरिष्ठांवर वेगवेगळे आरोप केले होते. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Varsha Gaikwad on Ranjitsinh Disale ) दखल घेतली. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेत सूत्रे हलली आहेत.

हेही वाचा- हृदयद्रावक.. शेततळ्यात बुडून आई व दोन चिमुकलींचा मृत्यू, उत्तर सोलापूर तालुक्यातील घटना

त्या अहवालाची होणार चौकशी?

सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीदेखील शनिवारी सायंकाळी डिसले गुरुजींना सोलापूर जिल्हा परिषद प्रशासन सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांना पीएचडीसाठी आणि पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची सुट्टी दिली आहे. शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी काय अहवाल तयार केला आहे, त्याबाबतदेखील चौकशी करणार असल्याची माहिती दिली.

हेही वाचा- Vishal Fateh Surrender : कोट्यावधींचा घोटाळा करणारा मुख्य संशयीत आरोपी विशाल फटे अखेर पोलिसांना शरण

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी झेडपी सीओंना दिले आदेश-
ग्लोबल टिचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. याप्रकरणी राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यांनी म्हटले, की माझे सीईओंशी बोलणे झाले आहे. त्यांना स्कॉलरशिपसाठी आवश्यक ती परवानगी दिली जावी. त्यांना विदेशात पाठवायचे आहे, असे शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी इगतपुरी ( Varsha Gaikwad on Ranjitsinh Disale ) येथे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा- Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींचा परदेशात जाण्याचा मार्ग अखेर मोकळा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सीईओंना निर्देश

पण उपशिक्षक रणजितसिंह यांची चौकशी होणार का?
सोलापूर जिल्हा परिषदेत कार्यरत असलेले उपशिक्षक रणजितसिंह डिसले यांनी 2017 ते 2020 या कालावधीत काय केले याबाबत अजूनही सखोल चौकशी झाली नाही. याबाबत एक फाईल तयार करण्यात आली आहे. लवकरच ती जिल्हापरिषद सीईओंकडे गोपनियरित्या सादर होणार होती. मात्र ऐनवेळी याबाबत गाजावाजा झाला आहे. ही फाईल प्रलंबितच राहणार का, असा प्रश्न शिक्षण खात्यातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना पडला आहे.

Last Updated : Jan 22, 2022, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.