ETV Bharat / state

जागतिक पर्यावरण दिवस : दुभाजकावरील झाडांच्या संवर्धनासाठी केले श्रमदान - Environment day solapur

जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा याचे निमित्त साधून शहरात सुमारे बारा ते पंधरा युवक एकत्र आले. त्यांनी पर्यावरण जागृतीचा आणि वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश दिला.

World environment day solapur
जागतिक पर्यावरण दिवस सोलापूर
author img

By

Published : Jun 5, 2020, 4:23 PM IST

सोलापूर - पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठी येथील बारा ते पंधरा युवकांनी एकत्र येत दुभाजकातील झांडाची निगा राखण्यासाठी श्रमदान केले. सकाळी दोन तास श्रमदान करत या युवकांनी दुभाजकावरील कचरा गोळा करून झाडांची छाटणी केली.

जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा याचे निमित्त साधून शहरात सुमारे बारा ते पंधरा युवक एकत्र आले. त्यांनी पर्यावरण जागृतीचा आणि वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश दिला. डफरीन चौक ते ध्रुव हॉटेलपर्यंतच्या दुभाजकावरील झाडांची निगा राखण्यासाठी या युवकांनी शुक्रवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत दुभाजकातील गवत काढले. कचरा गोळा केला आणि झाडांना आळे करून झाडांची छाटणी केली. दुभाजकामध्ये विविध फुलझाडे लावून सुशोभित करत श्रमदान केले.

या उपक्रमात शिवाजी सुरवसे, डॉ. प्रवीण ननवरे, विकास सूर्यवंशी, प्रफुल शेंडगे, तोगटवीर क्षत्रिय संघटनेचे संजीव उदगिरी, चेतन पूरुड, भारत उदगिरी, रामेश्वर उदगिरी अनिकेत पाटील, शिवानंद जाधव, अभिषेक उघडे, राजेश भोई आदी युवक सहभागी झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.