ETV Bharat / state

...तर तुरुंगाची हवा खावी लागेल - पोलीस अधीक्षक - सोलापूर कोरोना अपडेट

कोणाला अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचे असेल त्यांनी परवानगी घेऊन रस्ते खुले आहेत त्याचा वापर करावा. बंद असलेल्या रस्त्यांचा वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच इतर जिल्ह्यातून बाहेरून कुणी पाहुणे आले तर त्यांना येऊ देऊ नका. अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील  Superintendent of Police Manoj Patil  सोलापूर पोलीस अधीक्षक मनोज पाटील  सोलापूर कोरोना अपडेट  solapur corona update
पोलीस अधीक्षक मनोज पाटील
author img

By

Published : Apr 24, 2020, 10:04 AM IST

सोलापूर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात जिल्हा बंदीचा आदेश कडक करण्यात आला आहे. जिल्हा बंदीचे उल्लंघन करेल त्याला तुरुंगाची हवा खावी लागेल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला. करमाळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

...तर तुरुंगाचा हवा खावी लागेल - पोलीस अधीक्षक मनोज पाटील

करमाळ्यात लॉकडाउनला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून सोलापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला करमाळा तालुका आहे. या तालुक्याला पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. अहमदनगर व पुणे जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात कोणी प्रवेश करू नये, यासाठी करमाळा तालुक्यावर प्रशासनाने अधिक लक्ष दिले आहे. कोणी बाहेरून आले, तर करमाळा पोलिसांना याची माहिती द्या, असे पाटील म्हणाले.

इतर जिल्ह्यातून येणारे 37 रस्ते बंद केले असून 6 रस्ते खुले ठेवले आहे. कोणाला अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचे असेल त्यांनी परवानगी घेऊन रस्ते खुले आहेत, त्याचा वापर करावा. बंद असलेल्या रस्त्यांचा वापर करू नये. अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच इतर जिल्ह्यातून बाहेरून कुणी पाहुणे आले तर त्यांना येऊ देऊ नका. अन्यथा त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी तहसीलदार समीर माने, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.