ETV Bharat / state

सोलापूर: विशेष पथकाकडून सव्वा कोटी रुपयांची अवैध वाळू जप्त - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कण्हेर गावाजवळ अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 1 वाळू धुण्याची मशीन, 5 ब्रास वाळूचा साठा असा मुद्देमाल जप्त केला.

seizes illegal sand
अवैध वाळू जप्त
author img

By

Published : Oct 30, 2020, 10:13 AM IST

सोलापूर- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सोलापूर येथे रुजू झाल्यापासून अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली आहे. भीमा व सीना या मोठ्या नद्या सोलापुरातून जात असल्याने अवैध वाळू उपसा किंवा वाळू चोरी हा मोठा विषय आहे. पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कण्हेर, करमाळा येथील चिकलठाणा गावाजवळ वाळू उपशावर कारवाई केली. दरम्यान, 1 कोटी 26 लाख रुपयांची वाळू जप्त केली आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती

माळशिरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कण्हेर गावाजवळ अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथकाने गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर, 1 वाळू धुण्याची मशीन, 5 ब्रास वाळूचा साठा असा मुद्देमाल जप्त करून 5 जणांविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

विशेष पथकाची कारवाई

तसेच करमाळा येथील चिकलठाणा गावाजवळ असलेल्या नदी पात्रात देखील पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने कारवाई केली. त्याठीकाणी 3 हायवा ट्रक, 16 ब्रास वाळू साठा असा 66 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.असा एकूण सव्वा कोटी रुपयांचा वाळू साठा व त्यासंबंधीत मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध दारूवर कारवाई
पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने अवैध दारू उत्पादन धंद्यावर देखील मोठी कारवाई केली आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्पर्गा येथील अवैध दारू किंवा गावठी दारू उत्पादन अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. यामध्ये 189 बॅरल रासायन, 8 बॅरल मळी, 8 बॅरल हातभट्टी दारू, असा एकूण 9 लाख 58 हजार 400 रुपयांचा दारू साठा नष्ट करून 5 संशयित आरोपींवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा- घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर प्रकरणी तुमची थोबाडे बंद का ?

हेही वाचा- ईटीव्ही भारत विशेष : मिठाई खातायं? मग हा व्हिडिओ नक्की पाहा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.