सोलापूर : रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी सोलापुरात उद्योजक केतन शहा विरुद्ध साखर कारखानदार धर्मराज काडादी ( Ketan Shah Versus Sugar Factory Owner Dharmaraj Kadadi ) असे चित्र निर्माण झाले आहे. केतन शहा यांना धर्मराज काडादी यांनी 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिली ( Dharmaraj Kadadi Threatened Ketan Shah with a Revolver ) होती. याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर केतन शहा व त्यांच्यासोबत इतर सहकारी सदर बाजार पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार न देता तसेच परत गेले. पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केतन शहा यांनी केली.
![Solapur Revolver Case](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mhsol03policeissuedanoticetoketanshahintherevolvercaseotherwisedontdefamethepolice10032_30112022160803_3011f_1669804683_222.jpg)
पोलिसांनी केतन शहा यांच्याबरोबर धर्मराज काडादी यांना बजावली नोटीस : पोलिसांनी केतन शहा यांना या संपूर्ण प्रकराबद्दल नोटीस लेखी मागितले आहे. तुमची तक्रार असेल तर लेखी द्या, अन्यथा पोलिसांची प्रतिमा मालिन करू नका, असे नोटीसमध्ये सांगितले आहे. आम्हाला कळते गुन्हा दाखल करायचा की नाही उगाच शिकवण्याची गरज नाही. रिव्हॉल्व्हरप्रकरणी पोलिस आयुक्तांनी धर्मराज काडादी यांना खुलासा मागितला असताना, आता केतन शहा यांनीदेखील तक्रार द्यावी, अशी नोटीस देण्यात आली आहे.
नेमके काय आहे प्रकरण : 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन विमानतळसाठी बसलेल्या उपोषणकर्ते केतन शहा यांना दमदाटी केली होती. एक साखर कारखानदार उपोषण ठिकाणी येऊन रिव्हॉल्व्हर दाखवून गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत असल्याची चर्चा राज्यभर सुरू झाली. यानंतर 26 नोव्हेंबर रोजी रात्री सोलापुरातील काही उद्योजक आणि उपोषणकर्ते हे सदर बाजार पोलीस ठाणे येथे जाऊन आपसात चर्चा करून कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल न करता परत गेले होते.
केतन शहा म्हणतात पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा : केतन शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार एखाद्या सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होत असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केले कापले जातात, त्यावेळी पोलीस स्वतःहून गुन्हे दाखल करून कारवाई करतात. तर 26 नोव्हेंबर रोजी धर्मराज काडादी हे आम्हाला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिली, तर पोलीस स्वतः का गुन्हा दाखल करीत नाहीत.
पोलीस नोटिसीमध्ये म्हणतात, लेखी तक्रार द्या आम्ही कारवाई करू : पोलिसांनी बुधवारी केतन शहा यांच्या नावे नोटीस दिली. धर्मराज काडादी यांनी रिव्हॉल्व्हर दाखवून धमकी दिल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार द्यावी. माध्यमांना माहिती देत, पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करावा, अशी माहिती देत, पोलीस खात्याची बदनामी करू नये. तथा धर्मराज काडादी विरोधात काहीही तक्रार नाही, असे लेखी द्यावे. विनाकारण पोलीस खात्याची बदनामी करू नये, असे नोटीसमध्ये बजावले आहे.