ETV Bharat / state

रेशन कार्डला आधार व मोबाईल नंबर लिंक न केल्यास धान्य मिळणार नाही - सोलापूर जिल्हा लेटेस्ट न्यूज

जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांनी रेशन कार्डला आधार नंबर आणि मोबाइल नंबर लिंक करावा, आधार लिंक करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. रेशन कार्डला आधार नंबर लिंक नसल्यास धान्य मिळणार नाही. यांची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

रेशन कार्डला आधार व मोबाईल नंबर लिंक न केल्यास धान्य मिळणार नाही

author img

By

Published : Jan 31, 2021, 4:00 PM IST

पंढरपूर - जिल्ह्यातील रेशनकार्ड धारकांनी रेशन कार्डला आधार नंबर आणि मोबाइल नंबर लिंक करावा, आधार लिंक करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. रेशन कार्डला आधार नंबर लिंक नसल्यास धान्य मिळणार नाही. यांची गंभीर दखल लाभार्थ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचा आदेश

सोलापूर जिल्ह्यातील ऑगस्ट ते डिसेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत धान्य दुकानातून धान्य न घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या शिधापत्रिका तात्पुरत्या निलंबित करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील रेशन धारकांसाठी रेशन कार्डला आधार आणि मोबाईल लिंक करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात सहा लाख लाभार्थी

जिल्ह्यात ६ लाख ४० हजार लाभार्थ्यांनी अद्याप आपले मोबाई नंबर आणि आधार नंबर रेशन कार्डला लिंक केलेला नाही. यामध्ये अंत्योदय योजनेचे 22 हजार तर इतर 6 लाख 17 हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. ज्यांचे आधार कार्ड रेशन कार्डशी लिंक झाले नाही अशा नागरिकांनी तातडीने लिंक करावे असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

बोगस शिधापत्रिका कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश

जिल्हानिहाय उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी, पाच महिने धान्यांची उचल न केलेल्या शिधापत्रिका तात्पुरत्या स्वरुपात निलंबित कराव्यात, तपासणीमध्ये शिधापत्रिकाधारक धान्य घेण्यास इच्छुक असल्यास कागदपत्रांची पडताळणी करावी. सर्व लाभार्थ्यांचे आधार लिंक करून 14 फेब्रुवारीपर्यंत संबंधित शिधापत्रिकाधारकास धान्याचे वाटप व्हावे, तपासणीनंतर शिधापत्रिका बोगस आढळल्यास त्या कायमस्वरुपी रद्द कराव्यात, असे देखील आदेश देण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.