ETV Bharat / state

सायबर टेक कंपनीने सोलापूर पालिकेला लावला 3 कोटी 46 लाखांचा चुना

author img

By

Published : Jan 30, 2021, 4:20 PM IST

महापालिकेच्या हद्दीतील मिळकती जीआयएस प्रणालीशी लिंक करणे आणि कर आकारणी कामकाजाचे संगणकीकरण करण्याचा मक्ता सायबरटेक सिस्टीम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीस देण्यात आला होता. या कंपनीने काम अपूर्ण ठेवून बिले उचलली आणि महापालिकेची आर्थिक फसवणूक केली, सर्व्हर बंद ठेवून शासकीय कामांचे नुकसान केले, असा ठपका ठेवत महापालिकेने कंपनीचे पाच अधिकारी आणि महापालिकेचा एक नोडल अधिकारी यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सायबर टेक कंपनी सोलापूर महापालिका फसवणूक न्यूज

सोलापूर - शहरातील मिळकतींचे सर्वेक्षण करून जीआयएस प्रणालीशी लिंक करण्याच्या प्रकरणात महापालिकेने मक्तेदार कंपनीतील पाच अधिकारी आणि महापालिकेच्या एका नोडल अधिकाऱ्याविरोधात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे. सचिन अनिलकुमार कांबळे, रामा सुब्रमण्यम, जयंत पंत, विशाल बरगट, दिलीप पांचाळ, रोहन जगताप अशी संशयित आरोपींची नावे आहेत. या संशयित आरोपींनी सोलापूर महानगरपालिकेची 3 कोटी 46 लाख 7 हजार 309 रुपयांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सायबर टेक कंपनीने केली सोलापूर महापालिका फसवणूक

महापालिकेच्या हद्दीतील मिळकती जीआयएस प्रणालीशी लिंक करणे आणि कर आकारणी कामकाजाचे संगणकीकरण करण्याचा मक्ता सायबरटेक सिस्टीम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीस देण्यात आला होता. या कंपनीने काम अपूर्ण ठेवून बिले उचलली आणि महापालिकेची आर्थिक फसवणूक केली, सर्व्हर बंद ठेवून शासकीय कामांचे नुकसान केले, असा ठपका ठेवत महापालिकेने कंपनीचे पाच अधिकारी आणि महापालिकेचा एक नोडल अधिकारी यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोलापूर मनपाने दिलेल्या नियमावलीत कंपनीने जीआयएस प्रणालीचे संगणकीकरणाचे काम केले नाही

सोलापूर महानगरपालिकेने ठरवून दिलेले काम पूर्ण झाल्यावर त्याचे बिल सादर करणे, हे काम पूर्ण झाले की नाही हे काम नोडल ऑफिसरने तपासणे,यानंतर थर्ड पार्टीकडून प्रत्येक बिलांचे ऑडिट करून घेऊन पालिका आयुक्तांच्या मान्यतेने कंपनीला बिल अदा करण्यात यावे, अशी नियमावली होती.

हेही वाचा - औरंगाबादेत वक्फ बोर्डाच्या जागेवर बिल्डरचा कब्जा, 100 कोटींच्या घोटाळ्याचा जलील यांचा आरोप

कंपनीने एकदाच ऑडिट केले

सायबर टेक कंपनीने फक्त एकदाच थर्ड पार्टीकडून बिलाचे ऑडिट करून घेतल्याचे सोलापूर महानगरपालिकेच्या निदर्शनास आले. तसेच, या कंपनीने आजतागायत काम पूर्ण केले नाही. तसेच, नोडल ऑफिसर कांबळे यांनी बिलांची तपासणी न करता काम पूर्ण झाल्याचे बिले सादर करून सोलापूर महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये लाटले आहेत.

सायबर टेक कंपनीचे काम काय होते

सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील मिळकतधारकांचे सर्वेक्षण करून याची सर्व कामे संगणक प्रणालीद्वारे करून सोलापूर मधील मिळकतदारांना ही सेवा ऑनलाइन देण्याचे काम या सायबर टेक कंपनीला देण्यात आले होते. मात्र, आजतागायत या कंपनीने हे काम पूर्ण केले नाही.

2014 मध्ये सायबर टेक कंपनीला दिला होता मक्ता

सोलापूर महानगरपालिकेने सायबरटेक सिस्टिम्स अँड सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीला 26 ऑगस्ट 2014 रोजी सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करून मिळकती जीआयएस प्रणालीशी लिंक करणे व कर आकारणी कामकाजाचे संगणकीकरण करणे, इत्यादीचा मक्ता 5 कोटी 20 लाख रुपयांना दिला होता.

सोलापूर महानगरपालिकेच्या कामात अडथळा

महापालिकेने या कामासाठी नेमलेले तत्कालीन नोडल ऑफिसर यांनी कामाचे पूर्तता प्रमाणपत्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सायबरटेक कंपनीस दिले. त्यामुळे सायबरटेक कंपनीने काम अपूर्ण ठेऊन वेळोवेळी अपूर्ण कामांच्या बिलाची मागणी करून संगणक प्रणालीचा सर्व्हर बंद ठेऊन शासकीय कामात अडथळा आणला. याचा नागरिकांना नाहक त्रास झाला व मनपाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

हेही वाचा - मँगोनेटसाठी यावर्षी ४ हजार ५६६ शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.