ETV Bharat / technology

तुमचा मोबाईल फोन स्लो चार्ज होतोय?, बॅटरी बॅकअप कमी होण्याचं कारण काय? - Why Mobile Phone Charging Slowly

Why Mobile Phone Charging Slowly : स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या मोबाईल डिव्हाइसवर अधिक वेळ घालवतात. त्यामुळं स्लो चार्जिंगची समस्या होऊ शकते. तसंच हार्डवेअर, सॉफ्टवेअरच्या फोनची अकार्यक्षमता असे अनेक घटक चार्जिंग स्लो होण्यामागं कारणीभूत असतात.

Why Mobile Phone Charging Slowly
मोबाईल फोन स्लो का चार्ज होत आहे. (Why Mobile Phone Charging Slowly)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 28, 2024, 12:23 PM IST

हैदराबाद Why Mobile Phone Charging Slowly : आजकाल बहुतांश लोकांकडं अँड्रॉईड स्मार्टफोन आहेत. लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात मोबाईलचा सतत वापर करतात. बाजारात महागडे आणि प्रीमियम स्मार्टफोन उपलब्ध आहेत, जे लोक खरेदी करतात. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या स्मार्टफोन्समध्ये कालांतरानं अनेक प्रकारच्या समस्या दिसू लागतात. त्यापैकी सर्वात सामान्य समस्या म्हणजे बॅटरीची.

बॅटरी बॅकअप कमी : साधारणपणे तीन ते चार वर्षे स्मार्टफोन वापरला की, त्याचा बॅटरी बॅकअप कमी होतो. यासोबतच अनेक वेळा लोकांना स्मार्टफोनचे चार्जिंग स्लो होण्याची समस्या देखील भेडसावते. जर बॅटरी बॅकअप कमी असेल, तर नवीन बॅटरीनं ही समस्या सोडवता येते, परंतु जर चार्जिंग स्लो असेल तर लोकांना ही समस्या का होत आहे. परिणामी लोकांना सर्व्हिस सेंटर किंवा जवळच्या दुरुस्तीच्या दुकानात जावं लागतं. स्मार्टफोनचं चार्जिंग स्लो का होतं,?त्यामागील काय कारणं आहेत जाणून घेऊया या बातमीतून...

चार्जिंग स्लो का होते? : स्मार्टफोनच्या स्लो चार्जिंगची अनेक कारणं असू शकतात. यापैकी सर्वात सामान्य कारण म्हणजे कमकुवत किंवा खराब झालेले उर्जा स्त्रोत. याशिवाय तुम्ही वायरलेस चार्जिंग केलं तरी चार्जिंग स्लो होते. चार्जिंग पोर्टमध्ये घाण साचणं, हे देखील याचे कारण असू शकतं.

केबल किंवा चार्जर समस्या : स्लो चार्जिंगसाठी सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हजणे कमी दर्जाचं चार्जिंग केबल. कालांतरानं, केबल्स जीर्ण होतात, ज्यामुळं त्यांची कार्यक्षमता कमी होते. तुमच्या डिव्हाइससाठी शिफारस केलेल्या पॉवर आउटपुटची पूर्तता न करणारे चार्जर देखील चार्जिंग प्रक्रिया स्लो करू शकतात.

कमकुवत उर्जा स्त्रोत : लॅपटॉपचा यूएसबी पोर्ट किंवा कमी पॉवर ॲडॉप्टर वापरल्यानं चार्जिंग स्लो होऊ शकते. हे स्रोत वॉल आउटलेट चार्जरच्या तुलनेत कमी उर्जा देतात.

ॲप्स : पार्श्वभूमीत चालणारी काही ॲप्स फोन चार्ज होत असताना देखील बॅटरी उर्जा वापरू शकतात. सोशल मीडिया, नेव्हिगेशन आणि इतर ॲप्स प्रभावी चार्जिंग गती कमी करू शकतात.

बॅटरीचे आरोग्य : फोनच्या बॅटरीचं वय वाढत असताना त्यांची कार्यक्षमता कमी होतं, ज्यामुळं चार्जिंग कमी होते आणि क्षमता कमी होते. नवीन बॅटरीच्या तुलनेत जुन्या बॅटरीला पूर्ण चार्ज होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

चार्जिंगच्या सवयी : बरेच वापरकर्ते त्यांचा फोन वापरत असताना चार्ज करतात, ज्यामुळं डिव्हाइस चार्ज होत असताना वीज वापरली जाते. हे केवळ चार्जिंगचा वेग कमी करत नाही तर अधिक उष्णता निर्माण करते, ज्यामुळं बॅटरीचं आरोग्य कालांतरानं खराब होऊ शकतं.

सॉफ्टवेअर अपडेट्स : कालबाह्य सॉफ्टवेअर चार्जिंग प्रक्रियेच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. नियमित अपडेट बॅटरी कार्यक्षमतेसाठी चांगलं असतं. त्यामुळं तुमच्या फोनचं सॉफ्टवेअर अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे.

काय आहेत उपाय : स्मार्टफोनमधील स्लो चार्जिंगचे निराकरण करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला ही समस्या का उद्भवत आहे, हे शोधून काढावं लागेल. यासाठी, तुम्ही ते स्वतः तपासू शकता किंवा तुम्ही फोनच्या सेवा केंद्रात किंवा तुमच्या जवळच्या दुरुस्तीच्या दुकानात जाऊ शकता.

हे वाचलंत का :

  1. आता वीज बिलापासून मिळवा मुक्ती : नागरिकांना मिळतेय मोफत वीज, घरबसल्या इथं करा अर्ज - PM SURYA GHAR MUFT BIJLI YOJANA
  2. ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S24 लाँच, जाणून घ्या खास फिचर - Samsung Galaxy S24 launched
  3. शास्त्रज्ञांना समुद्रात सापडलं 'भूत', 8530 फूट पाण्याखाली करतं शिकार - ghost shark discovered

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.