ETV Bharat / bharat

भाजपाच्या नेत्याचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; आत्महत्या की हत्या, यावरुन उलट सुलट चर्चा, 'या' विरोधी पक्षनेत्याचे होते भाऊ - BJP Leader Body Found - BJP LEADER BODY FOUND

BJP Leader Body Found : भाजपा नेत्याचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना छत्तीगडमधील नाइला इथं शुक्रवारी रात्री घडली.

BJP Leader Body Found
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2024, 11:55 AM IST

रायपूर BJP Leader Body Found : रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मजवळ भाजपाच्या नेत्याचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना शुक्रवारी रात्री नाइला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि केबिन दरम्यान आढळून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मृतदेहाची ओळख पटवली. नाइला इथले भाजपा नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह असल्याची ओळख पटली. शेखर चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे भाऊ असून ते भाजपाचे सक्रिय नेते होते.

विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांच्या भावाचा मृत्यू : भाजपा नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह रेल्वे स्थानकाच्या जवळ आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूची बातमी शुक्रवारी रात्री पसरताच पोलीस अधीक्षकांसह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शेखर चंदेल यांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवत पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.

रेल्वे रुळावर भाजपा नेत्याचा आढळला मृतदेह : शेखर चंदेल यांच्या मृत्यूचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही. भाजपा नेते शेखर चंदेल रात्री 8.30 वाजता त्यांच्या राईस मिलमधून पायी निघाले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे रुळावरुन ते मोबाईलवर चर्चा करताना जात होते. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांना रेल्वेनं धडक दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र त्यांच्या मृत्यूचं खरं कारण पोलीस शोधत आहेत. त्यांच्या अंगात घातलेल्या शर्टावरुन त्यांची ओळख पटू शकली.

घटनास्थळी कुटुंबीयांचा मोठा आक्रोश : भाजपाचे नेते तथा माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांच्या भावाचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. शेखर चंदेल हे स्काऊट गाईड्सचे जिल्हा मुख्य आयुक्तपद भूषवत होते. त्यांनी पंचायत सदस्याची निवडणूकही लढवली आहे. शेखर चंदेल यांच्या निधनाचं वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश अद्यापही सुरू आहे. रात्रीपासूनच जिल्हा रुग्णालय परिसरात नागरिकांची ये-जा सुरू आहे.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! वडिलांसह 4 मुलींची आत्महत्या, दिल्लीतील रंगपुरी भागातील घटना - Father Suicide with 4 Daughters
  2. एम सिद्धरामय्या यांच्या अडचणी वाढल्या : MUDA घोटाळ्यात दाखल झाला गुन्हा - FIR Against CM Siddaramaiah

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.