ETV Bharat / state

महिला हत्या प्रकरण : तिघांना जन्मठेपेसह प्रत्येकी 50 हजारांचा दंड; सोलापूर सत्र न्यायालयाचा निकाल

author img

By

Published : Feb 5, 2020, 11:02 PM IST

आरोपींनी खुद्द न्यायाधीश आणि स्वतः च्याच वकिलांना धमकावले होते व न्यायालयीन प्रक्रियेतही हस्तक्षेप करत निकाल प्रक्रियेत अडथळा आणला होता. तरीही न्यायाधीशांनी विचलित न होता, महिलेची हत्या केलेल्या खटल्यात आरोपींना कठोर शिक्षा ठोठावली आहे.

solapur district court judgment
महिला हत्या प्रकरणातील तिघांना जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी 50 हजारांचा दंड

सोलापूर - लिफ्ट मागून क्रूझर जीपमध्ये बसलेल्या दोन महिलांना निर्जनस्थळी नेऊन त्यांचा गळा आवळून खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना सोलापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच आरोपींनी न्यायाधीश खटल्यावर सुनावणी करणारे व्ही. जी. मोहिते यांनी आणि खटल्यातील स्वत: च्याच वकीलांनाही धमकावले होते.

हेही वाचा - शरजीलला समर्थन देणाऱ्या आंदोलकांविरोधात भाजपची मुंबई पोलिसात तक्रार

अक्कलकोटच्या शिवाजी नगर तांड्यावरील भीमराव राठोड व दोन मुले राहुल, रोशन आणि राजू चव्हाण हे क्रूझर जीप (क्रमांक एमएच 13 एझेड 8196) मधून मंगळवेढ्याकडे निघाले होते. त्यावेळी ते कामतीनजीक रेश्मा पळसे आणि सुनंदा घोडके या भगिनींनी वडापची जीप समजून लिफ्ट मागितली. त्या जीपमध्ये बसल्यावर पुढे निर्जनस्थळी गेल्यावर भीमरावने रेश्मा आणि सुनंदा यांचा दोरीने गळा आवळला व त्यांच्याकडील मोबाईल, अंगावरील सर्व सोन्याचे दागिने लुटले. या घटनेत सुनंदा घोडकेंचा मृत्यू झाला मात्र रेश्मा पळसे बचावल्या. त्यांनी कामती पोलिसांत तक्रार दाखल केली. या खटल्याचा निकाल आज सोलापूर न्यायालायाने दिला. 15 साक्षीदार तपासून आरोपींना कडक शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

दरम्यान या आरोपींनी खुद्द न्यायाधीश आणि स्वतः च्याच वकिलांना धमकावले होते. शिवाय न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत निकाल प्रक्रियेत अडथळा आणला होता. तरीही न्यायाधीशांनी विचलित न होता, या आरोपींना कठोर शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने वाहनांची तोडफोड, गुन्हा दाखल

Intro:सोलापूर : लिफ्ट मागून क्रूझर जीपमध्ये बसलेल्या दोन महिलांना निर्जनस्थळी नेऊन त्यांचा गळा आवळून खून आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी चौघांना सोलापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी.मोहिते यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.याच आरोपींनी न्यायाधीश आणि खटल्यातील स्व वकील यांनांही धमकावले होते.

Body:अक्कलकोटच्या शिवाजी नगर तांड्यावरील भीमराव राठोड त्याची दोन मुलं राहुल,रोशन आणि राजू चव्हाण हे क्रूझर जीप क्रमांक एमएच 13 ए झेड 8196 मधून मंगळवेढ्याकडे निघाले होते.त्यावेळी ते कामतीनजीक रेश्मा पळसे आणि सुनंदा घोडके या भगिनींनी वडापची जीप समजून लिफ्ट मागितली..त्या जीपमध्ये बसल्यावर पुढे निर्जनस्थळी गेल्यावर भीमरावनं रेश्मा आणि सुनंदा यांचा दोरीने गळा आवळला...अन त्यांच्याकडील मोबाईल अन अंगावरील सर्व सोन्याचे दागिने लुटले..या घटनेत सुनंदा घोडके मृत झाल्या मात्र रेश्मा पळसे बचावल्या. त्यांनी कामती पोलिसांत फिर्याद दाखल केली.त्या खटल्याचा निकाल आज सोलापूर न्यायालायत लागला.15 साक्षीदार तपासून आरोपींना शिक्षा ठोठावण्यात आली.

Conclusion:दरम्यान या आरोपींनी खुद्द न्यायाधीश आणि स्वतःच्याचं वकिलाला धमकावले होते.शिवाय न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत निकाल प्रक्रियेत अडथळा आणला होता.तरीही न्यायाधीशांनी विचलित न होता...या क्रूरकरम्याना कठोर शिक्षा ठोठावली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.