ETV Bharat / state

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर लालपरीचा अपघात, चाकं निखळल्यानं बस पलटली, तीन प्रवासी गंभीर - चाकं निखळल्यानं एसटी बस पलटी

Solapur Bus Accident : चालत्या बसची चाकं निखळल्यानं झालेल्या अपघातात तीन प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना सोलापूर धुळे महामार्गावर रविवारी पहाटे झाली. चाकं निखळल्यानं एसटी बस पलटी झाली आहे.

Solapur Bus Accident
चाकं निखळल्यानं बस पलटली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 11:52 AM IST

Updated : Nov 26, 2023, 12:14 PM IST

सोलापूर Solapur Bus Accident : धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे सहाच्या सुमारास धावत्या एसटी बसचा जॉईंट तुटल्यानं चाकं निखळून अपघात झाला. या अपघातात सोलापूर डेपोमधून नांदेडकडं रवाना झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांत हा अपघात झाला आहे. जॉईंट तुटून एसटीचं चाकं बाजूला रस्त्यावर पडलं आहे. धावत्या एसटी बसचा चाक निखळल्यानं एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर लालपरीचा अपघात

अपघाताची माहिती समजताच वरिष्ठ अधिकारी दाखल : नांदेड डेपोची एसटी बस काही प्रवाशांना घेऊन सोलापूर डेपोमधून रविवारी पहाटेच्या सुमारास निघाली होती. जॉईंट तुटल्यानं धावती एसटी बस पलटी होऊन थांबली. अपघाताची भीषणता मोठी असून धावती बस महामार्गावर चाक निखळून पलटी झाली. सुदैवानं यामध्ये मोठी जीवितहानी झाली नाही. एसटी खात्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उळे कासेगाव या अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

Solapur Bus Accident
चाकं निखळल्यानं बस पलटली

लोखंडी जॉईंट तुटल्यानं एसटी बस पलटी : सोलापूर डेपोमधून एसटी बस रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदेडकडं रवाना झाली होती. एसटी बसमधून जवळपास 15 ते 20 प्रवासी प्रवास करत होते. सोलापूर शहराजवळ असलेल्या उळे-कासेगाव इथं अचानक एसटी बसचा लोखंडी जॉईंट तुटला आणि चाक निखळलं. जॉईंट तुटल्यानं धावती एसटी बस महामार्गावर हेलकावे खात पलटी झाली आणि अपघात झाला. धावत्या एसटी बसमधील अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Solapur Bus Accident
चाकं निखळल्यानं बस पलटली

वाढत्या अपघातानं प्रवाशात दहशत : सोलापूर बस स्थानकातून नांदेडकडं निघालेल्या एसटी बसचा 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर उळे कासेगाव इथं अपघात झाला. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. एसटी बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित निर्माण झालं आहे. एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे. एसटी प्रशासनाच्या तांत्रिक विभागाचे अधिकारी एसटी बस तपासत नाहीत का? असे प्रश्न प्रवासी करत आहेत. एसटी बसच्या वाढत्या अपघातामुळं एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरलं आहे.

एसटी बसच्या किरकोळ अपघातांची संख्या वाढली : एसटी बसच्या अपघाताची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. 21 नोव्हेंबर रोजी दुपारी सोलापूरहून लातूरकडं जाणाऱ्या एसटी बस चालकाचं स्टेरिंगवरील नियंत्रण सुटल्यानं एसटी थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली होती. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले होते. सोलापूर - तुळजापूर रोडवरील कासेगाव जवळ हा अपघात झाला होता. या एसटी बसमधील प्रवासी पुणे, कर्नाटक आणि मराठवाड्यातील होते. किरकोळ अपघातामुळे एसटी बसमधून प्रवासाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या अपघातामुळे प्रवासी एसटी बसनं प्रवासाकडं पाठ फिरवत आहेत.

हेही वाचा :

  1. Solapur Accident : स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 6 जण ठार
  2. Solapur Accident : चार वाहनांचा विचित्र भीषण अपघात, महिलेचा मृत्यू
  3. Solapur Accident : शाळेजवळच सिमेंटचा बल्कर उलटला; 4 जणांचा मृत्यू

Last Updated : Nov 26, 2023, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.