सोलापूर - सांगोला तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून सहा विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 28 व 29 ऑगस्टला या ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी या ग्रामपंचायतीवर या प्रशासकपदी या विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर तसेच लॉकडाउनमुळे मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार, सांगोला तालुक्यातील आलेगांव, आगलावेवाडी, बामणी, चोपडी, देवळे, एखतपूर, गायगव्हान, हलदहिवडी, महिम, मेडशिंगी, नाझरे, निजामपूर, संगेवाडी, सोमेवाडी, तरंगेवाडी, वासुद या 16 ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून सहा विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 व 29 ऑगस्टला या ग्रामपंचायतींची मुदत संपलेल्या प्रशासकपदी विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आलेगांव, आगलावेवाडी, हलदहिवडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी एम. एस. सावंत, बामणी, चोपडी, देवळे ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी एस. बी. घाडगे, एखतपुर व गायगव्हाण ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी जे. एन. टकले, महिम व संगेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी एस. जे. नागटिळक, मेडशिंगी, नाझरे व सोमेवाडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी वाय. एस. गोटे, निजामपूर, तरंगेवाडी व वासुद ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदी विस्तार अधिकारी व्ही. के. काळूखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.