ETV Bharat / state

भारतीय संस्कृती व परंपरा सांगणाऱ्या हिरव्या चुडाचे महत्त्व - तुळशी चुडा किंवा लग्न चुडा

धार्मिक सोहळ्यामध्ये महिलांच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी परंपरेप्रमाणे बांगड्यांचा वापर केला जातो. यामध्ये हिंदू धर्मात हिरव्या बांगड्यांना तुळशी चुडा किंवा लग्न चुडा म्हणून ओळखला जातो. तर मुस्लिम समाजातील महिलावर्गात पोपटी रंग असलेला सोडा घालण्याची परंपरा आहे. यातून धार्मिक सोहळ्यातून हिरव्या चुड्याना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते.

हिरव्या चुडाचे महत्त्व
हिरव्या चुडाचे महत्त्व
author img

By

Published : Nov 21, 2021, 9:00 AM IST

पंढरपूर - हिंदू संस्कृतीमध्ये नव वधू साठी हिरव्या चुड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चुड्यातूनच नववधूचा शृंगार दिसून येतो. हिंदू परंपरेनुसार हिरवा रंग हा समृद्धी व ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. यातून नववधूच्या रूपाने घरात समृद्धी येते, अशी लोकांची धारणा आहे. लग्न सोहळ्यादरम्यान हिरव्या किंवा लाल काचेच्या बांगड्यांचा चुडा भरण्याची पद्धत आहे. त्याला सौभाग्याच लेणं असेही म्हटले जाते. याला महाराष्ट्रामध्ये वधूच्या बांगड्यांना लग्न चुडा असेही म्हणतात, अशी माहिती सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाचे अध्यक्ष भारत छगन कोकीळ यांनी दिली आहे.

भारतीय संस्कृती व परंपरा सांगणाऱ्या हिरव्या चुडाचे महत्त्व

परंपरेनुसार हिरव्या चुड्याची अख्यायिका...

शेकडो वर्षापासून हिंदू धर्मामध्ये लग्न समारंभामध्ये हिरव्या बांगड्यांना विशेष असे स्थान आहे. यामध्ये तुळशी चुडा म्हणून नववधूसाठी वापरण्यात येत असतो. त्यातील वैशिष्ट्येप्रमाणे नववधूसाठी एका हातामध्ये जुळ्याप्रमाणे चुडा भरविला जातो. तर दुसऱ्या हातामध्ये 11 जुळ्या घातल्या जातात. या सर्व हिरव्या चुड्यामध्ये शास्त्रीय कारणही आढळून येते. हिरव्या चुड्यातून नववधूसह महिला वर्गांमध्ये आकर्षण असते. त्यातून महिलांच्या सौंदर्यामध्ये भर पडत असते. हिरव्या शालूवर हिरवा चुडा महिलांच्या सौंदर्यात फुलवण्याचे काम करत असते.

हिरव्या चुडाचे महत्त्व
हिरव्या चुडाचे महत्त्व

धार्मिक सोहळ्यातून आढळणारी एकात्मता -

धार्मिक सोहळ्यामध्ये महिलांच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी परंपरेप्रमाणे बांगड्यांचा वापर केला जातो. यामध्ये हिंदू धर्मात हिरव्या बांगड्यांना तुळशी चुडा किंवा लग्न चुडा म्हणून ओळखला जातो. तर मुस्लिम समाजातील महिलावर्गात पोपटी रंग असलेला सोडा घालण्याची परंपरा आहे. यातून धार्मिक सोहळ्यातून हिरव्या चुड्याना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे दिसून येते.

शास्त्रीय कारणाने हिरवा चुडा -
शेकडो वर्षापासून भारताच्या विविध प्रांतातील महिलावर्ग हिरव्या चुडा परिधान करतो. यातून धार्मिक संस्कृती बरोबर शास्त्रीय कारणांचा दाखलाही दिला जातो. हिरवा रंग हा नवीन उत्पत्ती, सर्जनशीलता आणि पोषकतेचे घोतक म्हणून ओळखले जाते. स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्यांचा चांगला उपयोग होतो. बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण होते असेही कारण दिले जाते. बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात त्याचप्रमाणे त्या संस्कृत वाटतात आणि त्यामुळे त्यांच्या सौंदर्यामध्ये अधिकच भर पडल्याचे ही दिसून येते

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.