सोलापूर - मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरवरून मुंबईला निघालेली सिद्धेश्वर एक्स्प्रेस दौंड येथेच थांबण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी काल सोमवारी रात्री सोलापूर रेल्वे स्थानकातून निघाली होती.
मुंबईतील लोकल सेवाही ठप्प -
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई केल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. याचा परिणाम उपनगरीय रेल्वेवरदेखील झाला आहे. सीएसटी-ठाणे आणि सीएसटी-वाशीपर्यंतची लोकल सेवाही पूर्णपणे ठप्प झाली आहे.
सायन-माटुंगा-कुर्लादरम्यान ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने पुढील सुचना मिळेपर्यंत या मार्गावर एकही लोकल धावणार नसल्याचे मध्यरेल्वेने स्पष्ट केले आहे. तसेच शासनाकडून मुंबईत आठवडाभरासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.