ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू; पहिल्याच दिवशी 935 जणांनी घेतला लाभ - शिवभोजन थाळी

लॉकडाऊनमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. यापैकी 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र आज सुरु झाली. या 11 ठिकाणी 935 लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला.

Shiv Bhojn Kendra started at 11 places in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू
author img

By

Published : Apr 1, 2020, 10:51 PM IST

सोलापूर- लॉकडाऊनमुळे गरीब आणि गरजू लोकांच्या भोजनाची व्यवस्था होण्यासाठी जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्रे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. यापैकी 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र आज सुरु झाली. या 11 ठिकाणी 935 लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला, अशी माहिती मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.

Shiv Bhojn Kendra started at 11 places in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात 11 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू

सोलापूर शहरातील पाच ठिकाणी शिवभोजन केंद्र पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 11 ठिकाणी आज शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली. उर्वरित 12 ठिकाणी लवकरच ही केंद्रे सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या मजुरांना जिल्हा प्रशासनातर्फे अन्न धान्य वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या एकूण 56 संस्था संपर्कात असून त्यांच्या सहाय्याने महापालिका क्षेत्रात अन्न धान्यांचे वितरण केले जाणार आहे. यामध्ये 5 किलो आटा, 2 किला तांदुळ, 1 किलो तुर किंवा मूग डाळ, खाद्य तेल एक किलो अशा वस्तुंचे वितरण केले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.