ETV Bharat / state

शरद पवारांची सोलापुरात बैठक सुरू, काँग्रेसचे नेतेही उपस्थित - बैठक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोलापूर शहरातील बैठक सुरू झाली आहे. शरद पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचेही नेते उपस्थित आहेत.

Solapur
author img

By

Published : Feb 21, 2019, 12:36 PM IST

Updated : Feb 21, 2019, 12:44 PM IST

सोलापूर - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोलापूर शहरातील बैठक सुरू झाली आहे. शरद पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह काँग्रेसचेही नेते उपस्थित आहेत. शहरातील रामलाल चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये ही बैठक सुरू झाली आहे.

या बैठकीमध्ये शरद पवार सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत.

शरद पवारांच्या या बैठकीला पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके, सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून स्वतः शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या जागेवर काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेणार आहेत. २००९ ची लोकसभा निवडणूक शरद पवार यांनी माढ्यातून तर सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांनी लढवली होती.

undefined

Intro:R_MH_02_SOLAPUR_21_SHARAD_PAWAR_IN_SOLAPUR_S_PAWAR

शरद पवारांची सोलापुरात बैठक सुरू, काँग्रेसचे नेतेही उपस्थित
सोलापूर-
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोलापूर शहरातील बैठक सुरू झाली आहे शरद पवारांच्या बैठकीला राष्ट्रवादीच्या प्रमुख नेते काँग्रेसचेही नेते उपस्थित आहेत सोलापूर शहरातील रामलाल चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांमध्ये ही बैठक सुरू झाली असून या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा शरद पवार हे घेत आहेत. महारा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत

Body:शरद पवारांच्या या बैठकीला पंढरपूरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भारत भालके सांगोल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. महारा लोकसभा मतदारसंघातून स्वत शरद पवार हे लोकसभेची निवडणूक लढणार असून सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या जागेवर काँग्रेसचे नेते आणि माजी गृह मंत्री सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे अनुषंगाने शरद पवार यांनी ही बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती जाणून घेणार आहेत 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील यातून शरद पवार आणि सोलापूर मधून सुशीलकुमार शिंदे हे लोकसभेला राहिलेले होते

Conclusion:
Last Updated : Feb 21, 2019, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.