सोलापूर T Raja Singh: वक्फ बोर्ड कायदा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभा संपन्न झाली. टी राजा सिंह यांनी भाषणात पुण्यातील कुख्यात गुंड ज्याची शुक्रवारी हत्या झाली त्या शरद मोहोळचा आवर्जून उल्लेख केला. (Hindutva activist) शरद मोहोळ हा माझा खूप चांगला मित्र होता. तसेच तो एक खरा हिंदुत्ववादी नेता होता; मात्र काही हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या चमच्यांनी त्याचा खून केला. पुण्यातील सासवड भागात सभा होणार होती. त्या सभेत शरद मोहोळ आणि माझी भेट होणार होती. मात्र दुर्दैवाने त्याचा खून झाला. शरद मोहोळ आणि मी शिर्डी येथील हिंदू आक्रोश सभेत संबोधित केले होते, असं सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कातील सिद्दीकीच्या खुनाबाबत उल्लेख: शरद भाऊ असा उल्लेख करत आमदार टी राजा सिंह यांनी कातील सिद्दीकीच्या खुनाबाबत उल्लेख केला. शरद मोहोळला शरद भाऊ असे संबोधित करत शिर्डी येथील श्रीरामपूर येथील सभेबाबत जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद भाऊने येरवडा येथील तुरुंगात असताना, एका आतंकवाद्याला वर पाठवले म्हणजेच 72 हुरांकडे पाठवले असं टी राजा यांनी भाषणातून सांगितले. शरद मोहोळ याची कातील सिद्दीकी खून प्रकरणात सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली असताना, तेलंगाणा राज्यातील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी स्पष्टपणे आणि अप्रत्यक्षरित्या शरद मोहोळच्या बाबतीत खुनाची कबुली दिली.
शरद मोहोळसाठी टी राजासिंह यांनी केली प्रार्थना: तेलंगाणा राज्यातील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी व्यासपीठावर भाषण करताना शरद भाऊसाठी प्रार्थना करा, असं आवाहन केलं. आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करा, या संबोधनपर भाषणातून हिंदू बांधवाना आवाहन केलं. शरद भाऊ असते तर आज पत्नीसह सोलापुरातील हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले असते. शरद मोहोळ यांनी आपले आयुष्य गोरक्षणासाठी वाहून घेतले. देशासाठी स्वतःला वाहून घेतले होते; पण काही चमच्यांनी शरद मोहोळची हत्या केली असं सांगत, शरद मोहोळला श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा: