ETV Bharat / state

पंढरपुरात अल्पवयीन मुलीवर सात दिवस आत्याचार, आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक - अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पंढरपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे.

rape on a minor girl
rape on a minor girl
author img

By

Published : Oct 27, 2021, 12:25 AM IST

Updated : Oct 27, 2021, 12:35 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - पांडुरंगाच्या नगरीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सात दिवस अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीवरून पंढरपूर शहर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

पंढरपूर शहरात मन हेलवणारी घटना घडली आहे. एका नराधमाने सात दिवस पीडित मुलीवर अत्याचार केले. अत्याचार करणारा आरोपी हा प्रस्थापित नेत्यांच्या संपर्कातील व्यक्ती आहे. पंढरपूर शहर पोलीस कारवाई करत असताना राज्य सरकारकडून दबाव येत आहे. पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळाला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे पेटून उठेल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

हे ही वाचा - दहिसर नाक्यातून 27 किलो चरस जप्त, मुंबई पोलिसांची कामगिरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरात अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहते. मुलगी पाच महिन्यापासून एका मुलाच्या संपर्कात आली. त्यातून वारंवार फोनवर बोलणे होत असल्याचे आईला दिसून आले. आईने समजून काढली. त्यानंतर मुलाने पीडित मुलीच्या घरी जाऊन सलग सात दिवस मुलीवर अत्याचार केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी विकास जाधव याला अटक केली आहे.

Last Updated : Oct 27, 2021, 12:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.