सोलापूर - एकिकडे समाजातील स्वत:ला अतिसुशिक्षित समजणारा समाज लोकशाहीच्या सर्वात मोठ्या असणाऱ्या उत्सवाकडे पाठ फिरवताना दिसतो. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील तब्बल एक आजीबाईने गेल्या 67 वर्षांपासून न चुकता मतदान करत सर्वांसमोर आदर्श प्रस्थापित केला आहे.
हेही वाचा - प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क, आघाडीचे सरकार येणार असल्याचा व्यक्त केला विश्वास
जिल्ह्यातील माढा शहरातील इंदुमती कोडिंबा देवकर असे या आजीबाईंचे नाव आहे. त्या आता 105 वर्षांच्या आहेत. विशेष म्हणजे या आजीबाईंनी 1952 सालापासून सुरु झालेल्या निवडणुक प्रक्रियेपासुन ते आतापर्यंत प्रत्येक निवडणूकीत न चुकता मतदान केले आहे. म्हणून नेहमीप्रमाणे त्यांनी आज(सोमवारी) देखील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.
हेही वाचा - आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर प्राणघात हल्ला, चारचाकी पूर्णत: जळून खाक
आपल्या घरापासून मतदान केंद्रापर्यत चालत येऊन त्यांनी स्वतः मतदान केले. यावेळी तसेच सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावून आपला लोक प्रतिनिधी निवडायला हवा, असे आवाहन या आजीबाईनी केले.